नास्ता, जेवणासह आदिवासींसाठी आधुनिक शेती सहल

By admin | Published: March 10, 2017 03:26 AM2017-03-10T03:26:40+5:302017-03-10T03:26:40+5:30

बोरलॉग इस्टिटयुट फॉर साउुथ एशिया (बिसा) व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत येथील आदिवासी

Modern farming trips for children with breakfast, dinners | नास्ता, जेवणासह आदिवासींसाठी आधुनिक शेती सहल

नास्ता, जेवणासह आदिवासींसाठी आधुनिक शेती सहल

Next

जव्हार : बोरलॉग इस्टिटयुट फॉर साउुथ एशिया (बिसा) व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत येथील आदिवासी
शेतक ऱ्यांकरीता शैक्षणिक सहलीचे बिसा फार्म जबलपुर येथे आयोजन केले होते. क्लायमेट स्मार्ट व्हिलेज हा उपक्रम गेल्या वर्षापासून पालघर जिल्हयातील ७० गावांमध्ये बिसा संस्थेद्वारे तसेच मंत्रालयातील आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहभागाने कार्यान्वीत आहे.
तसेच पालघर जिल्यातील एकुण १०० इच्छुक तसेच प्रगतशील शेतकरी या शैक्षणिक सहलीकरीता नेण्यात आले होते. यासाठी बिसा व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांजकडुन शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी प्रवासाची व्यवस्था, नास्ता , जेवण व रहाण्याची योग्य प्रकारे केली होती. या कृषी सहलीचा मुख्य उद्देश हवामानातील होणारे बदल तसेच संवेदनक्षम शेती करणे, शाश्वत कृषी संवर्धन, विविध प्रकारच्या पीक पदधती व त्यांचे प्रात्याक्षिक त्याच बरोबर आधुनिक कृषी अवजारे विविध सिंचन, जलसंधारण पदधती इत्यादींची माहीती व मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे बदलत्या हवामानामुळे होणारा कृषी पदधती व मानवी जीवन तसेच सभोवतालच्या वातावरणाचा होणारा दुष्परिणाम व त्यासाठीच्या उपाययोजना यासाठीचे सुसुत्रीकरण हा होता. तसेच हा अभ्यास दौरा डॉ. पंकजसिंग स्टेशन समन्वयक व डॉ.राजकुमार जाट अ‍ॅग्रोनॉमिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आला होता. याबाबत शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी मिळालेले मार्गदर्शन हे एक अतिशय प्रभावी व मोलाचे असून आम्ही याचा अवलंब निश्चितच करू असे म्हटले आहे. तसेच संस्थेमार्फत केलेल्या सर्व सोयी व मार्गदर्शनामुळे आम्ही या दोन्ही संस्थांचे आभारी आहोत याचाही उल्लेख शेतकऱ्यांनी या ठिकाणी केला आहे. तसेच अशाच प्रकारच्या सहली अगर मार्गदर्शन केल्यास आपला पालघर जिल्हा प्रगतीच्या वाटेवर राहील, अशी विनंती देखील या वेळी करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Modern farming trips for children with breakfast, dinners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.