स्थानिक शिक्षकांना प्राधान्य, अनेक आंदोलनांना अखेर आले यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 02:18 AM2018-08-06T02:18:27+5:302018-08-06T02:18:35+5:30

जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे.

Priority to local teachers, many protests came to an end | स्थानिक शिक्षकांना प्राधान्य, अनेक आंदोलनांना अखेर आले यश

स्थानिक शिक्षकांना प्राधान्य, अनेक आंदोलनांना अखेर आले यश

Next

हितेन नाईक 
पालघर : जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे. पारदर्शक पद्धतीने ही निवड प्रक्रि या पार पडल्याने पालघर जिल्हा परिषदेने एक वेगळा आदर्श पायंडा पाडला आहे.
जिल्हा परिषदेच्या ८ वी इयत्तेपर्यंतच्याच शाळा असूूून ८ वी उत्तीर्ण होऊन गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना इतर शाळेत अतिरिक्त तुकड्या उपलब्ध नसल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाण्याची दाट शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने शाळांतील ९ वी व १० वी च्या अतिरिक्त तुकड्याना मान्यता देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे जिल्हा परिषद शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांना धाडला होता. हे अतिरिक्त विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता अखेर शालेय शिक्षण विभागाने ३१ जुलै २०१५ ला त्यास मान्यता दिली. या अंतर्गत जिल्ह्यातील ६० शाळांचा तुकडी वाढीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानुसार जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३९ शाळांतील या तुकड्यांसाठी तात्पुरत्या ११४ शिक्षक भरतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शेष फंडातून मंजूर केला. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी), वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचा समावेश असलेली निवड समिती स्थापन करण्यात आली आणि शिक्षण विभागाकडून वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. याअंतर्गत उमेदवारांनी अध्यापक शिक्षण केलेल्या विद्यापीठातून मिळविलेल्या गुणांकानुसार त्यांची पात्रता ठरविण्यात आली. विशेष बाब म्हणजे यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले असून यात त्यांना २० अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत.
या शिक्षक भरतीसाठी जि. प.शिक्षण विभागाने विज्ञान, गणित व इंग्रजी विषयासाठी शिकविणाºया उमेदवारांचे अर्ज १२ ते १९ जुलै २०१८ पर्यंत मागविले. यामध्ये ४५६ अर्ज प्राप्त झाले. २० ते २४ जुलै पर्यंत आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर २५ जुलै रोजी तात्पुरत्या पात्र उमेदवारांच्या याद्या घोषित करण्यात आल्या. यानंतर अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या. यामध्ये ३१ उमेदवारांनी हरकती घेतल्या. त्याची शहानिशा करून काही मान्य करण्यात आल्या व त्या वेबसाईट वर अंतिम यादी प्रसिद्ध करून निवड करण्यात आल्या.
>नियुक्ती नऊ महिन्यांसाठी मासिक मानधन आठ हजार रुपये
जिल्ह्यात शिक्षकांची ११४ पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे कारण देऊन आंदोलन करून शाळेला टाळे ठोकण्याचे प्रकार वाढीस लागले होते. शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत ह्यासाठी शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव गेला आहे. जि.प.ने स्वत:च्या शेष फंडातून निधीची व्यवस्था करून ७५ पदे भरण्यात यश मिळविले आहे. ९ महिन्यांसाठी ८ हजार रु पये मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरीत ३९ पदे टप्प्या टप्प्याने भरली जातील. शिक्षण विभागाकडील रिक्त जागांचा प्रश्न सुटल्यास ९ महिन्यानंतर या नियुक्त्या आपोआपच बरखास्त होतील. मात्र शासनस्तरावर हा प्रश्न ताटकळत राहिल्यास या ७५ शिक्षकांना पुढची मुदतवाढ मिळू शकते.
>स्थानिकांना प्राधान्य देताना गुणवान शिक्षक मिळावेत म्हणून पारदर्शक निवड केली आहे. -राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी
स्थानिकांचा त्यांचा अधिकार मिळवून देणारी व त्यांना न्याय देणारी ही भरती आहे. - हरेश गावित,
सायवन जि. प.शाळा डहाणू

Web Title: Priority to local teachers, many protests came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक