मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने साजरी केली दुहेरी दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:56 AM2019-10-26T00:56:18+5:302019-10-26T00:57:10+5:30
सरनाईकांची हॅटट्रिक; नरेंद्र मेहतांचा झाला पराभव
मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने दुहेरी जल्लोष करत दिवाळी साजरी केली. ओवळा- माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी विजयाची हॅट्ट्रिक करतानाच दुसरीकडे मीरा-भाईंदर मतदारसंघातून अपक्ष गीता जैन यांना उघड पाठिंबा देत भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहतांचा दारुण पराभव शिवसेनेने घडवून आणला. बाळासाहेबांच्या कलादालनाला विरोध, उद्धव ठाकरे व शिवसैनिकांचे काढलेले संस्कार आदी अनेक कारणांनी पेटून उठलेल्या शिवसैनिकांनी मेहतांना कात्रजचा घाट दाखवत किरीट सोमय्या केला.
मीरा-भाईंदरचा बराचसा भाग ओवळा-माजिवडा मतदारसंघात येत असून शिवसेनेचे सरनाईक तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याने शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. वास्तविक, मेहता व सरनाईकांचा वाद टोकाला गेला होता, तेव्हा मेहतांनी सरनाईकांना पराभूत करण्याचा इशारा दिला होता. परंतु, माजी महापौर गीता जैन या मेहतांविरोधात मीरा-भार्इंदर मतदारसंघातून मैदानात उतरल्याने मेहतांनी १४६ मधील भाजपच्या सर्व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आपल्या मतदारसंघात तैनात केले होते.
भाजपची मदत नसतानाही शिवसैनिकांनी सरनाईकांचा दणदणीत विजय साजरा केला. सरनाईकांच्या विजयाची हॅट्ट्रिक साजरी करतानाच शिवसैनिकांनी मेहतांचा दारुण पराभव घडवून आणला. महापालिकेत एकहाती सत्ता आल्यावर मेहतांनी शिवसेनेला नेहमीच लक्ष्य केले होते. त्यामुळे मेहतांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने उघडपणे मेहतांच्या विरोधात मैदानात उतरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने दुहेरी जल्लोष करत दिवाळी साजरी केली. ओवळा- माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी विजयाची हॅट्ट्रिक करतानाच दुसरीकडे मीरा-भार्इंदर मतदारसंघातून अपक्ष गीता जैन यांना उघड पाठिंबा देत भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहतांचा दारुण पराभव शिवसेनेने घडवून आणला. बाळासाहेबांच्या कलादालनाला विरोध, उद्धव ठाकरे व शिवसैनिकांचे काढलेले संस्कार आदी अनेक कारणांनी पेटून उठलेल्या शिवसैनिकांनी मेहतांना कात्रजचा घाट दाखवत किरीट सोमय्या केला.
मीरा-भाईंदरचा बराचसा भाग ओवळा-माजिवडा मतदारसंघात येत असून शिवसेनेचे सरनाईक तिसºयांदा आमदार म्हणून निवडून आल्याने शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. वास्तविक, मेहता व सरनाईकांचा वाद टोकाला गेला होता, तेव्हा मेहतांनी सरनाईकांना पराभूत करण्याचा इशारा दिला होता. परंतु, माजी महापौर गीता जैन या मेहतांविरोधात मीरा-भाईंदर मतदारसंघातून मैदानात उतरल्याने मेहतांनी १४६ मधील भाजपच्या सर्व नगरसेवक, पदाधिकाºयांना आपल्या मतदारसंघात तैनात केले होते.
भाजपची मदत नसतानाही शिवसैनिकांनी सरनाईकांचा दणदणीत विजय साजरा केला. सरनाईकांच्या विजयाची हॅट्ट्रिक साजरी करतानाच शिवसैनिकांनी मेहतांचा दारुण पराभव घडवून आणला. महापालिकेत एकहाती सत्ता आल्यावर मेहतांनी शिवसेनेला नेहमीच लक्ष्य केले होते. त्यामुळे मेहतांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने उघडपणे मेहतांच्या विरोधात मैदानात उतरले.