वीजवाहिनी पडून सहा म्हशी मृत्युमुखी

By admin | Published: July 5, 2017 06:00 AM2017-07-05T06:00:41+5:302017-07-05T06:00:41+5:30

पालघर रस्त्यालगत मनोर येथे वीज वाहिनी पडून एका शेतकऱ्याच्या सहा म्हशी जागीच ठार झाल्या. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे

Six buffaloes killed in a TV channel | वीजवाहिनी पडून सहा म्हशी मृत्युमुखी

वीजवाहिनी पडून सहा म्हशी मृत्युमुखी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : पालघर रस्त्यालगत मनोर येथे वीज वाहिनी पडून एका शेतकऱ्याच्या सहा म्हशी जागीच ठार झाल्या. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली. दुग्धव्यावसायिक असलेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
घरत पाडा येथील सुनील घरत यांच्या म्हशी पराजित नगरच्या जवळ शेतामध्ये चरत असतांना जास्त दाबाची मुख्य वीज वाहीनी त्यांच्या अंगावर पडली. तिला त्या चिकटल्या व जागीच त्यांचा मृत्यू ओढावला. त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबियांवर शेतीच्या ऐन हंगामात संकट ओढवले आहे. त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह दुधाच्या धंद्यावर चालत होता आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर महावितरणचा एकही अधिकारी फिरकला देखील नाही महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ही गंभीर घटना घडली अशा अनेक घटना पालघर जिल्हयात घडतात मात्र त्याबाबत कारवाई शून्य होते.
मनोर पालघर रस्त्याच्या बाजूला दोन इंग्लिश मिडीयम शाळा व भर वस्ती आहे. तिथे जर ही वाहिनी कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
शेतीला जोड देण्यासाठी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या सुनील घरत यांच्या एका एका म्हशीची किंमत ९०,००० ते ९५,०००० पर्यंत होती मनोर पोलीस ठाण्यात शेतकरी घरत यांनी तक्र ार दाखल केली आहे अधिक तपास मनोर पोलीस करीत आहे.त्यांना शासनाने व महावितरणने तातडीने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.

विजेची तार पडून शेतकऱ्याबरोबर बैलाचा दुर्दैवी मृत्यू

वाडा : तालुक्यातील सापने खु. ह्या गावातील झिपरु धनगर (५४) हा शेतकरी नांगरणी करीत असतांना सकाळी ११ च्या सुमारास विजेची तार नांगराला जुंपलेल्या बैलाच्या अंगावर पडल्याने त्याचा व झिपरु धनगर या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यात सध्या चांगल्या प्रकारे पाऊस पडत असल्याने भात लागवाडीची कामे मोठ्या प्रमाणात चालू झाली आहेत. त्यामुळे शेतात भरपूर मनुष्यबळ असते. या घटने नंतर लगेचच गावकऱ्यांनी महावितरणशी संपर्क साधून वीज पुरवठा खंडीत केला.

पुरवठा खंडित झाल्यावर या बैलाला आणि मयत झिपरु धनगर यांना बाहेर काढण्यात आले. घराच्या बाजूलाच नांगरणी सुरू असल्याने झिपरु धनगर यांची सून सुद्धा शेतातच होती. विजेची तार पडल्याने झिपरु धनगर खाली कोसळले. त्या वेळेस त्याची सून बांधावर होती. तिला वाटले की थकव्याने किंवा चक्कर आल्याने ते खाली कोसळले असावेत. त्यामुळे ती त्यांना उचलायला धावत गेली. मात्र अगदी जवळ गेल्यावर तिच्या लक्षात विजेची तार तुटल्याचे आल्याने ती जागीच थांबली म्हणून नशिबाने वाचली.

Web Title: Six buffaloes killed in a TV channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.