थर्टी फर्स्टनिमित्त डहाणूत बुकिंग फुल्ल, पर्यटकांची मांदियाळी : एमटीडीसी नसल्याने आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 02:18 AM2017-12-23T02:18:25+5:302017-12-23T02:18:49+5:30
डहाणू पर्यटनस्थळी हॉटेल आणि रेस्टोरंटची बुकिंग फुल झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागणार आहे. मात्र, लालिफतीत अडकल्याने बोर्डीतील एमटीडीसी जमीनदोस्त झाल्याने परगावतील पर्यटकांना आर्थिक फटका तसेच गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : डहाणू पर्यटनस्थळी हॉटेल आणि रेस्टोरंटची बुकिंग फुल झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागणार आहे. मात्र, लालिफतीत अडकल्याने बोर्डीतील एमटीडीसी जमीनदोस्त झाल्याने परगावतील पर्यटकांना आर्थिक फटका तसेच गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
या विकेन्डपासूनच पर्यटक डहाणूत दाखल होत असल्याने सर्वच हॉटेल व रेस्टोरेंटची बुकिंग फुल झाली आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सुरिक्षततेच्या दृष्टीने अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. पारनाका येथील बीचलगत प्रशासनाकडून पार्किंगची सोय करण्यात येत नसल्याने अनेक वेळा वादावादी होऊन भांडणाचे प्रसंग निर्माण होतात. नगर पालिका क्षेत्रा बाहेरच्या हॉटेल्सना महामार्गाचे बंधन पाळावे लागत असून मद्यविक्र ीला परवानगी नाही.परंतु बर्याच ठिकाणी बंदी झुगारून परगावतील पर्यटकांसाठी मद्याची सोय केली जाते. त्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये रोष असून राज्य उत्पादन विभागाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी या काळात हॉटेल्स मध्ये बालमजूर कामाला ठेवले जातात, त्यामुळे या बाबीकडे लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.
बोर्डी या पर्यटनस्थळीही सर्वच हॉटेल्सची बुकिंग फुल आहे. येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गेस्टहाऊस सीआरझेडच्या जाळ्यात अडकल्याने मागील चार-पाच वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटकांना महागड्या हॉटेल्समध्ये जाऊन आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिवाय ईच्छा असूनही जागा उपलब्ध नसल्याने मुंबई आण िउपनगरातील पर्यटकांना घरचा रस्ता धारावा लागतो.
महाराष्ट्र सागरी मंडळाकडून पर्यटन विकासासाठी तालुक्यातील चिंचणी, नरपड, चिखले, घोलवड आण िबोर्डी या पाच गावांची निवड निर्मल सागरतट अभियानाअंतर्गत करण्यात आली आहे. परंतु शासनाने लाखोंचा निधी देऊन एका वर्षाचा कार्यकाल उलटल्यानंतरही ठोस काम झालेले नाही. त्यामुळे पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. या कडे सदर विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.