पालघरच्या प्रचारात रंगली उद्धव ठाकरे आणि योगींची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 10:55 PM2018-05-23T22:55:11+5:302018-05-23T22:55:11+5:30

पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार आली असून, कट्टर हिंदुत्ववादाची प्रतिमा मिरवणारे भाजपा आणि शिवसेनेचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आले आहेत.

Uddhav Thakre and Yogi Jugalbandi in the campaign of Palghar | पालघरच्या प्रचारात रंगली उद्धव ठाकरे आणि योगींची जुगलबंदी

पालघरच्या प्रचारात रंगली उद्धव ठाकरे आणि योगींची जुगलबंदी

googlenewsNext

विरार - पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार आली असून, कट्टर हिंदुत्ववादाची प्रतिमा मिरवणारे भाजपा आणि शिवसेनेचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आले आहेत. आज प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली. 
योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेच्या वर्तणुकीवर टीका करताना शिवसेना ही शिवाजी महाराजांचे नाव घेते, पण काम मात्र अफजल खानासारखे करते, अशी टीका केली.  
तर उद्धव ठाकरे यांनी जो मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात उमेदवार जिंकून न आणू शकणारा मुख्यमंत्री येथे प्रचार करत आहे. असा टोला योगी आदित्यनाथ यांना लगावला.  "अबकी बार आता लोक पुढच्या निवडणुकीची वाट पाहतायत, आता अबकी बार नाही यांचा फुसका बार. मुख्यमंत्री म्हणतात शिवसेनेने पाठीत वार केला पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच येणार हे माहित असतानाच त्यांनी गावित यांच्याशी बोलून ठेवले , मग त्यांनी श्रीनिवास वनगा  याना का सांगितले नाही, मुख्यमंत्री म्हणतात आमच्या मनात होते मग तुम्ही मोदी सारखे रेडिओवर का नाही बोलला.'' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.  

Web Title: Uddhav Thakre and Yogi Jugalbandi in the campaign of Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.