दुर्दैवी! अंगावर झाडाची फांदी कोसळून अग्निशमन जवानाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:49 PM2018-12-07T18:49:09+5:302018-12-07T18:50:59+5:30

ही घटना गुरूवारी विरारच्या जीवदानी पाड्यात घडली. बिपिन म्हात्रे (३९) असे मयत जवानाचे नाव आहे. 

Unfortunate! Dangers of fire brigade collapse | दुर्दैवी! अंगावर झाडाची फांदी कोसळून अग्निशमन जवानाचा मृत्यू

दुर्दैवी! अंगावर झाडाची फांदी कोसळून अग्निशमन जवानाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देजवानाचा अंगावर झाडाची फांदी कोसळून दुर्दैवी मृत्यूही घटना गुरूवारी विरारच्या जीवदानी पाड्यात घडली.बिपिन म्हात्रे (३९) असे मयत जवानाचे नाव आहे

विरार - वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानाचा अंगावर झाडाची फांदी कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी विरारच्या जीवदानी पाड्यात घडली. बिपिन म्हात्रे (३९) असे मयत जवानाचे नाव आहे. 

बिपीन म्हात्रे पालिकेच्या अग्निशमन विभागात वाहनचाललक पदावर कंत्राटी पध्दतीने कार्यरत होते. गुरूवारी दुपारी ड्युटी संपवून ते मित्राला भेटण्यासाठी विरार पूर्व येथील जीवदानी पाड्यात गेले होते. त्या ठिकाणी एक चिंचेचे झाड कापण्याचे काम सुरू होते. म्हात्रे हे काम पाहण्यासाठी गेले. त्या ठिकाणी उभे असताना अचानक एक मोठी फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. त्यांना उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित कऱण्यात आले. सफाळे गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि दोन मुले असा परिवार आहे.म्हात्रे ड्युटीवर नसताना ही दुर्घटना घडली. ते झाड कापण्यासंदर्भात आम्हाला माहिती नव्हती, असे पालिकेचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. 

Web Title: Unfortunate! Dangers of fire brigade collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.