‘संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला’
By admin | Published: April 29, 2017 01:18 AM2017-04-29T01:18:02+5:302017-04-29T01:18:02+5:30
येथील विद्यार्थी भारती संघटना दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र दिनानिमित्त वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित उपक्रम आयोजित करत असते.
सफाळे : येथील विद्यार्थी भारती संघटना दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र दिनानिमित्त वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित उपक्रम आयोजित करत असते. हे कार्यक्र माचे चौथे वर्ष असून या वर्षी ‘संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अशी माहिती कार्यक्र म प्रमुख मोनाली भोईर व ज्योती निकाळजे यांनी दिली आहे.
सर्वांसाठी मोफत असणारा हा कार्यक्र म दि. १ मे रोजी सायं.४ वा. मराठी शाळा क्र .१, नारोडा, सफाळे (पू) येथे होणार असून या कार्यक्र माचे उद्घाटक शाहीर इंद्रायणी आत्माराम पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ लेखक राजन खान व गणाई संस्थापक किशोर जगताप हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्र मास मराठी भारतीचे अध्यक्ष ज्योती बडेकर, विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा पूजा बडेकर, राज्याध्यक्षा विजेता भोनकर, गणाई प्रमुख राहुल घरत व कार्यक्र माचे संकल्पनाकार विद्यार्थी भारती राज्य संघटक स्वप्नील तरे हे उपस्थित राहणार असल्याचे विद्यार्थी भारती पल्लवी पाटी यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
या कार्यक्रमात पोवाडे, लावणी, काही ठराविक लोककलांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील काही क्षण अनुभवायला मिळणार आहेत. त्यासाठी सदानंद राणे दिग्दिर्शत ‘सांस्कृतिक जागर’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे हुतात्मा झाले त्यांच्या कुटुंबियांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासोबत पालघर भूषण, उत्कृष्ट कार्यकर्ता असे अनेक पुरस्कार देण्यात येणार आहेत.(वार्ताहर)