विरारमध्ये तरुणाची सेल्फी काढून आत्महत्या, नोकरीसाठी घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:02 AM2017-09-28T01:02:02+5:302017-09-28T01:02:22+5:30
नोकरी लागत नाही, त्यातच आई वडिलांनी नोकरीसाठी काढलेले कर्ज यामुळे नैराश्य आलेल्या सोमनाथ शिंदे या मांडवे बुद्रुक (संगमनेर) येथील युवकाने विरारमध्ये गळफास लावून मंगळवारी आत्महत्या केली.
वसई : नोकरी लागत नाही, त्यातच आई वडिलांनी नोकरीसाठी काढलेले कर्ज यामुळे नैराश्य आलेल्या सोमनाथ शिंदे या मांडवे बुद्रुक (संगमनेर) येथील युवकाने विरारमध्ये गळफास लावून मंगळवारी आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने सेल्फीही काढला होती.
डोमॅस्टिक एअरपोर्टवर लोडर म्हणून नोकरीस लावण्यासाठी सिन्नर येथील एजंटला त्याने ६० हजार रुपये दिले होते. त्यासाठी वडिलांनी कर्ज काढले होते. एक महिना उलटून गेल्यानंतरही नोकरी लागत नव्हती
तो विचारणा करीत होता. पण, एजंट टाळाटाळ करीत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याला वाटू लागले होते. वडिलांनी घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्नही त्याला पडला होता. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने सेल्फी काढून तो रुममेट आणि एजंटला व्हॉटसअपद्वारे पाठवून दिला होता. वडिलांनी नोकरीसाठी घेतलेले सावकरी कर्ज फेडू शकत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे सोमनाथने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.