१७९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी
By admin | Published: October 15, 2016 02:41 AM2016-10-15T02:41:44+5:302016-10-15T02:41:44+5:30
जिल्हास्तरीय समितीद्वारे चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
वाशिम, दि. १४- १२ वर्षे एकाच पदावर सेवा देणार्या जिल्हा परिषदेच्या १७९ प्राथमिक शिक्षकांच्या चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीच्या प्रस्तावांना १४ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली.
१२ वर्षे एकाच पदावर काम करणार्या शिक्षकांना पदोन्नतीची संधी नसल्याने त्यांना चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात येते. वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत एकूण २८७५ सहायक शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी १२ वर्षे सेवा देणार्या शिक्षकांकडून वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. एकूण १७९ शिक्षकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवण्यात आले. १४ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डी.एच.जुमनाके, शिक्षण विभागाचे अधीक्षक खुळे आदींची उपस्थिती होती. प्रस्तावांवर चर्चा होऊन १७९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली. दिवाळीपूर्वी या प्रस्तावांना निकाली काढल्याने ही शिक्षकांसाठी ह्यदिवाळी भेटह्ण असल्याचे मानले जात आहे.