ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:20 PM2018-01-16T16:20:42+5:302018-01-16T16:25:05+5:30

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत.

55 projects in Washim district that are dry | ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे

ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे

Next
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, असे तीन मध्यम, तर १२३ लघू प्रकल्प आहेत. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पात २४ टक्केही उपयुक्त साठा उरला आहे.सोनल प्रकल्पाची स्थिती सर्वात गंभीर असून, या प्रकल्पात जेमतेम २ टक्के जलसाठा उरला आहे.

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. अर्थात या प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे, तर उवरित ७१ प्रकल्पांसह एकूण १२६ प्रकल्पांची पाणी पातळी १८ टक्के च आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने त्वरीत उपाय योजना करणे आवश्यक आहे.

वाशिम जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, असे तीन मध्यम, तर १२३ लघू प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांपैकी वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पात २४ टक्केही उपयुक्त साठा उरला आहे, तर अडाण प्रकल्पात २१ टक्के जलसाठा आहे. सोनल प्रकल्पाची स्थिती सर्वात गंभीर असून, या प्रकल्पात जेमतेम २ टक्के जलसाठा उरला आहे. त्याशिवाय वाशिम तालुक्यातील बोराळा, धुमका, काजळांबा, कळंबा महाली, कार्ली, सावंगा, सावरगाव जिरे, सोनखास, सोयता, उमरा कापसे, उमरा शमशोद्दिन, वाई सावळी, उमरा कापसे सं, जनुना सोनवळ, ब्रम्हा संग्रा, सुरखंडी या १६ प्रकल्पांत, मालेगाव तालुक्यातील बोरगांव, ब्राम्हणवाडा, कळमेश्वर, कोल्ही, कुºहळ, मालेगाव, मुंगळा, रिधोरा, सोमठाणा, खडकी, मैराळडोह, या ११ प्रकल्पांत, रिसोड तालुक्यातील  बोरखेडी, हराळ, करडा, मांडवा, मोरगव्हाण, या पाच प्रकल्पांत, मंगरुळपीर तालुक्यातील  दस्तापूर, सार्सी बोथ, सिंगडोह, चांदई, कवठळ या पाच प्रकल्पांत, मानोरा तालुक्यातील आसोला इंगोले, चौसाळा, धानोरा भुसे, गारटेक, गिद, कार्ली, पिंप्री हनुमान, वाईगौळ, हिवरा खु, भिलडोंगर या १० प्रकल्पांत आणि कारंजा तालुक्यातील मोखड पिंप्री, ऋषी तलाव, शहा, सोहळ, मोहगव्हाण, धामणी या सहा प्रकल्पांत मिळून एकूण ५५ प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त साठा उरला आहे. विशेष म्हणजे यातील ५२ प्रकल्पांतील उपयुक्त साठा डिसेंबर २०१७ च्या मध्यातच संपला होता आता. उर्वरित ६७ मध्यम प्रकल्पांत १६ टक्केही जलसाठा उरलेला नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात निर्माण होणाºया भीषण पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाला त्वरीत उपाय योजना कराव्या लागणार आहेत. 

Web Title: 55 projects in Washim district that are dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.