मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:55 PM2018-01-04T13:55:38+5:302018-01-04T13:58:01+5:30
वाशिम - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकासह पंचायत समितीच्या पथकाने ४ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात कारवाई करीत उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेतले.
वाशिम - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकासह पंचायत समितीच्या पथकाने ४ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात कारवाई करीत उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेतले. सर्वांना दंड भरण्यासंदर्भात ग्रामसेवकामार्फत नोटीस पाठविली जाणार आहे. दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण करणाºया एका युवकाविरूद्ध शेलुबाजार पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली.
मंगरूळपीर तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने गुरूवारी पहाटे ५.३० वाजतापासून मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी, हिरंगी, लाठी, शेलु आणि चिखली येथे भेटी देत उघड्यावर शौचास जाणाºयांना समज दिली तर काही जणांना ताब्यात घेतले. गोगरी येथील एका युवकाने गुड मॉर्निंग पथकासोबत हुज्जत घातली तसेच सरपंच गणेश बोथे यांच्याशी वादही घातला. सदर युवकास शेलुबाजार पोलीस चौकीच्या हवाली करण्यात आली तसेच तक्रारही देण्यात आली. गोगरी येथील २३ लोकांना पकडण्यात आले. या सर्वांना ग्रामसेवकामार्फत दंड भरण्याची नोटीस पाठविली जाणार आहे. दंड भरण्यास तयार न होणाºया गोगरी, लाठी व शेलुबाजार अशा गावातील एकूण सात जणांना शेलुबाजार पोलीस चौकीत आणण्यात आले होते. सर्वांना समज देऊन सोडण्यात आले. मंगरुळपीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एन.टी. खैरे, जि. प. स्वच्छ भारत मिशनचे राम श्रृंगारे यांच्या नेतृत्वात ही मोहिम राबविण्यात आली. पथकामध्ये विस्तार अधिकारी भिकाजी पद्मने, वंजारे, पंडीत राठोड, ज्ञानेश्वर महाले, अभिजित गावंडे, ग्रामसेवक सुनिल सुर्वे, ठोंबरे, वाशिम येथील होमगार्ड अनिता सहस्रबुध्दे, नरेंद्र बगळे यांचा सहभाग होता.