कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मानोरा येथे दाखविले काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 04:33 PM2018-02-27T16:33:39+5:302018-02-27T16:33:39+5:30

मानोरा :  राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत २७ फेब्रुवारी रोजी मानोरा तालुका दौऱ्यावर असताना मानोरा येथील शिवाजी चौकात दुपारी १२ वाजताच्या दरम्यान विविध संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काळे झेंडे दाखवून रोष व्यक्त केला.

The black flag shown to Minister of State for Agriculture Sadabhau Khot in Mansora | कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मानोरा येथे दाखविले काळे झेंडे

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मानोरा येथे दाखविले काळे झेंडे

Next
ठळक मुद्देना. सदाभाऊ खोत तालुक्यातील चिखली, धानोरा, सोयजना आदी भागात दौऱ्यासाठी जात होते. प्रहार संघटना, शेकाप व राष्ट्रवादी  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त करुन शेतकऱ्यां विविध योजनांचा लाभ दयावा अशा घोषणा दिल्या जिल्हयाची आणेवारी ४५ पैसे असून सुध्दा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला नाही याबाबत रोष व्यक्त करण्यात आला.

मानोरा :  राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत २७ फेब्रुवारी रोजी मानोरा तालुका दौऱ्यावर असताना मानोरा येथील शिवाजी चौकात दुपारी १२ वाजताच्या दरम्यान विविध संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काळे झेंडे दाखवून रोष व्यक्त केला.

ना. सदाभाऊ खोत तालुक्यातील चिखली, धानोरा, सोयजना आदी भागात दौऱ्यासाठी जात असताना प्रहार संघटना, शेकाप व राष्ट्रवादी  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त करुन शेतकऱ्यां विविध योजनांचा लाभ दयावा अशी घोषणा करीत ना. खोत यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला. यावेळी सुनिल जामदार, भाई धोटे, श्याम पवार, निखिल पाटील, आकाश पाटील यासह शेकाप, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत असतांना सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली नाही. जिल्हयाची आणेवारी ४५ पैसे असून सुध्दा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला नाही याबाबत रोष व्यक्त करण्यात आला.

Web Title: The black flag shown to Minister of State for Agriculture Sadabhau Khot in Mansora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.