बियर बारचे शटर तोडून ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 05:57 PM2018-07-24T17:57:37+5:302018-07-24T17:59:11+5:30

वाशिम - स्थानिक पुसद नाका परिसरातील पंजाबी तडका या बियर बारचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजाराची विदेशी दारु व रोख ४ हजार असा एकुण ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.

Break the shutter of bar and stolen 54 thousand ruppes | बियर बारचे शटर तोडून ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास !

बियर बारचे शटर तोडून ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास !

Next
ठळक मुद्देपुसद नाका परिसरात गोपाल काठोळे यांचे पंजाबी तडका रेस्टारंट व बियर बार आहे. नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी ते गेले असता दुकानचे शटर तुटलेले दिसले. दुकानातील विदेशी दारुच्या बॉटल व रोख ४ हजार असे एकुण ५४ हजाराचा माल चोरीला गेल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - स्थानिक पुसद नाका परिसरातील पंजाबी तडका या बियर बारचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजाराची विदेशी दारु व रोख ४ हजार असा एकुण ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २४ व २५  जुलैचे रात्रीदरम्यान घडली. 
पुसद नाका परिसरात गोपाल काठोळे यांचे पंजाबी तडका रेस्टारंट व बियर बार आहे. नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी ते गेले असता दुकानचे शटर तुटलेले दिसले. दुकानमधे जाऊन बघितले असता दुकानातील विदेशी दारुच्या बॉटल व रोख ४ हजार असे एकुण ५४ हजाराचा माल चोरीला गेल्याचे दिसून आले. याशिवाय चोरट्यांनी सीसी टिव्हीचे डिव्हीआर बॉक्सही लंपास केला. याप्रकरणी अद्याप पोलीस स्टेशनला नोंद नाही. दरम्यान, अलिकडच्या काळात शहर व परिसरात चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहणे शहरवासियांना अपेक्षीत आहे.

Web Title: Break the shutter of bar and stolen 54 thousand ruppes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.