विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 08:02 PM2017-10-12T20:02:13+5:302017-10-12T20:04:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय तंत्रनिकेतच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत वाशिम बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान १० आॅक्टोंबर रोजी राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय तंत्रनिकेतच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत वाशिम बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान १० आॅक्टोंबर रोजी राबविण्यात आले.
शासकीय तंत्रनिकेतन वाशिमच्या विद्यार्थ्यांनी व अध्यापकांनी यावेळी प्रवाशांना एक कदम स्वच्छता की ओर हा मोलाचा संदेश दिला. यावेळी बसस्थानक व परिसरात विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता रॅली काढण्यात आली. रासेयो समन्वयक आर.जी.बिलोलीकर व एम.डी.मोरे यानी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व विषद करुन आपले घर व परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवुन रोगराईला दूर ठेवावे असे आवाहन केले. या अभियानात बसस्थानकातील सर्व प्लॅटफार्मस, व आजुबाजुचा सर्व परिसर स्वच्छ करण्याात आला. विद्यार्थ्यांच्या या कार्यामुळे बसस्थानक परिसर चकाकुन गेला होता. या अभियानाला यशस्वी करण्याकरिता संस्थेचे प्राचार्य डॉ.दिनेशकुमार गुप्ता,विभाग प्रमुख व्ही.जे.डोंगरे व आगार प्रमुख इलामे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. शासकीय तंत्रनिकेतन वाशिमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमाचे बसस्थानक कर्मचारी व प्रवाशांनी कौतुक केले.