'बेटर टुमारो फाऊंडेशन'च्यावतीने शाळांना संगणक संच वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:10 PM2018-04-18T14:10:48+5:302018-04-18T14:10:48+5:30
मालेगांव: तालुक्यातील जि.प.शाळा बोरगांव येथे बेटर टुमारो फाऊंडेशन कडुन संगणकसंच भेट देण्यात आले.
मालेगांव: तालुक्यातील जि.प.शाळा बोरगांव येथे बेटर टुमारो फाऊंडेशन कडुन संगणकसंच भेट देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामराव गुडदे हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन सरपंच लांडकर,उपसरपंच कालापाड .प्रा.सचिन लाटे, सतिष घुगे उपस्थित होते. त्यावेळी विद्यार्थांना व नागरीकांना मार्गदर्शन करतांना बेटर टुमारो संस्थेचे संस्थापक वामनराव सानप यांनी सांगितले की, बेटर टुमारो संस्थेकडुन अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. आत्तापर्यंत ५७ ग्रामीण भागातील शाळांना संगणक संचाचे पाठ्यक्रम सॉप्टवेअरसह वाटप करण्यात आले आहे.यावेळी शाळेच्यावतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमात प्रमुख पाहुने, विद्यार्थी व उपस्थित नागरीकांना अल्पोपहार देण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्र संचालन विनोद गाढे यांनी केले. प्रास्ताविकामधुन मुख्याध्यापक संतोष काटेकर यांनी सानप यांचे आभार मानलेत.यावेळी शाळेतील शिक्षक आपोतीकर, गवळी , इढोळे , बळी आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केशव शिंदे यांनी केले.