मालेगाव येथे विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 08:00 PM2017-08-14T20:00:21+5:302017-08-14T20:00:45+5:30
मालेगाव :- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या व इतर मागण्यासाठी आज आमदार बच्चु कडु समर्थक व शेतकऱ्यांच्या वतीने मालेगाव येथील शेलुफाट्यावर रस्तारोको करण्यात आला .
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव :- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या व इतर मागण्यासाठी आज आमदार बच्चु कडु समर्थक व शेतकऱ्यांच्या वतीने मालेगाव येथील शेलुफाट्यावर रस्तारोको करण्यात आला .
सरकारने शेतकऱ्यांना माफ देलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी जाहीर केली . यावेळी आमदार बच्चु कडु समर्थकांनी व शेतकऱ्यांनी ३० जुन २०१७ पर्यंत सरसकट कर्जमाफी दया, स्वामीनाथन आयोग लागु करा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या इत्यादी मागण्यासाठी आ. बचु कडु समर्थक, शेतकरी व शंभूराजे प्रतिष्ठानाच्या वतीने शेलु फाटा येथे चक्का ज्जाम करण्यात आला. या चक्का जाम आंदोलनात गजानन बोरचाटे, विजय शेंडगे, भगवान बोरकर, अजय घुगे, महादेव बोरचाटे, दत्ता बोरचाटे, गजानन शिंदे, संतोष पवार, ओम चतरकर, हरीभाऊ लहाने, किशोर देवळे, गोपाल पवार, राजु गायकवाड, विलास तांबेकर, बालाजी टटाले, किशोर शिंदे, विशाल सदार, अतुल ठाकरे, नागेश गरकळ, नितीन बोरचाटे, अनिकेत अंभोरे, ओम गायकवाड, गजानन अंभोरे, पप्पु अंभोरे, विनोद गायकवाड, पवन पाटील, आकाश खवले, प्रभाकर बोरचाटे सह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या चक्का जाम आंदोलनाला मालेगाव येथील शंभुराजे प्रतिष्ठाण चा पाठीबा होता. रास्ता रोको दरम्यान मालेगाव-वाशीम, मालेगाव-शेलु बाजार, व मालेगाव शहरात जाणार्या मार्गावर गाड्यांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. या रास्ता रोको दरम्यान कोणत्याही प्रकारचा नागरिकांना त्रास होवु नये या करिता पोलीस प्रशासना चोख बंदोबस्त होता.