बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्यास शेतक-यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 07:58 PM2017-09-21T19:58:04+5:302017-09-21T19:58:13+5:30

वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्याच्या घोषणेच्या निषेधार्थ व असे होवु नये यासाठी जुमडा , अटकळी, टो,येवती, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, बोरखेडी, वाघोली, इत्यादी परिसरातील हजारो श्ेतकºयांच्या स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग वाशिम,  जिल्हाधिकारी वाशिम, यांना निवेदन देण्यात आले. 

Farmers' protest to take water from Garage dam to Aaburgi | बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्यास शेतक-यांचा विरोध

बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्यास शेतक-यांचा विरोध

Next
ठळक मुद्देशेतक-यांचे स्वाक्षरी अभियानपालकमंत्री व जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्याच्या घोषणेच्या निषेधार्थ व असे होवु नये यासाठी जुमडा , अटकळी, टो,येवती, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, बोरखेडी, वाघोली, इत्यादी परिसरातील हजारो श्ेतकºयांच्या स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग वाशिम,  जिल्हाधिकारी वाशिम, यांना निवेदन देण्यात आले. 
जुमडा येथील पैनगंगा  नदीवरील बॅरेज २०१६- १७ मध्ये कार्यान्वीत झाले आहे. या बॅरेजमुळे जुमडा येथील व  परिसरातील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली  आली आहे तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा स्त्रोत या गावाच्या परिसरात उपलब्ध नाही.भिषण पाणी टंचाईतील ही गावे बॅरेजमुळे पाण्याच्या स्वयंमपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. अशातच सिंचनासाठी कर्ज काढुन सिचंन  व्यवस्था व याच शेतकºयांनी कार्यान्वीत केली आहे.यामध्ये भरपुर शेतकºयांची विजेची सोय करणारी पोटची भाकर म्हणजे मालकीची शेतजमीन शासनाने हस्तांतरीत केली आहे. शेतजमीन गेली तर त्याच फायदा याच भागातील शेतकºयांना होईल या आशेने शेतकºयांनी जमीनी दिल्या. परंतु नुकत्याच वाशिममधुन झालेल्या घोषणेचा संदर्भ लक्षात घेता हे पाणी वाशिम शहराला पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काही पुढारी एकबुर्जी धरणामध्ये नेण्याच्या आटोकाट प्रयत्नात दिसत आहेत. त्यांच्या या संदर्भातील वर्तमानपत्रात छापुन आलेल्या बातमीतील घोषणेच्या निषेधार्थ या परिसरातील शेतकरी निवेदन देवुन समाधान न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत  आहेत. सदरचे निवेदन देतांना नारायण गणपत शिंदे, उध्दव केशव शिंदे, जुमडा विनोद श्रीराम ठाकरे, मोहन किसन ठाकरे अटकळी,  सुर्यकांत राजाराम हजारे, अडगाव, यांचेसह वरील सर्व गावचे शेकडो नागरीक उपस्थित होते. सदर पाणी एकबुर्जी जलसाठ्यात नेण्यात भेटु नये असे जुमडा, कोकलगाव, अडगाव, टो व गणेशपुर येथील ग्रामपंचायतीचे ठराव सुध्दा निवेदनासोबत जोडले आहेत.

Web Title: Farmers' protest to take water from Garage dam to Aaburgi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.