माजी आमदार प्रकाश डहाके यांचा शिवसेनेत प्रवेश
By Admin | Published: July 15, 2017 01:56 AM2017-07-15T01:56:34+5:302017-07-15T01:56:34+5:30
कारंजा लाड : कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांनी १४ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांनी १४ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सन २००९ मध्ये कारंजा विधानसभा मतदार संघातून प्रकाश डहाके विजयी झाले होते. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकिट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. २०१४ पासून ते कोणत्याही पक्षाशी अधिकृतपणे संबंधित नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. १४ जुलै रोजी अधिकृतरीत्या शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्यामुळे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे चित्र बदलण्याचेही संकेत मिळत आहे. डहाके यांच्या पक्ष प्रवेशानंतर समर्थक व हितचिंतकांनी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. मुंबई येथे प्रवेशाच्या वेळी खासदार भावना गवळी यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.