गायीच्या गोठ्यातील चार विषारी सापांना एकाच वेळी पकडून दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 11:07 PM2017-11-13T23:07:31+5:302017-11-13T23:07:48+5:30
वाशिम: गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून वावरत असलेल्या घोणस जातीच्या (रसेल वायपर) विषारी सापांना वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडत जंगलात सोडून जीवदान दिले.
वाशिम: गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून वावरत असलेल्या घोणस जातीच्या (रसेल वायपर) विषारी सापांना वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडत जंगलात सोडून जीवदान दिले. हा थरारक प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथे सोमवारी असंख्य ग्रामस्थांनी पाहिला.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील लाठी येथील शेतशिवारात शेतकरी मनोहर सुर्वे यांच्या गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून सापांचा वावर मनोहर सुर्वे यांना आढळून आला. त्यामुळे गायीच्या गोठ्यात ठेवलेला कडबा काढताना जिवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी ही बाब मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या वाईल्डलाईफ कंझर्वेशन चमूतील सहकाºयांना कळविली. त्यानंतर गौरव कुमार इंगळे आणि त्यांचे सहकारी श्रीकांत ढापसे, शुभम ठाकूर, कुणाल ठाकूर आणि उमेश पाटील हे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना सदर साप हे घोणस (रसेल वायपर) या अतिशय विषारी जातीचे असल्याचे स्पष्ट झाले.
प्रत्यक्षात शेतात आढळणारे साप पकडणे हा प्रकार वन्यजीव रक्षणाच्या प्रकारात मोडत नाही, कारण सापांचा वावर हा शेतात असतो आणि हा प्राणी शेतक-यांसाठी फायद्याचाही आहे; परंतु संबंधित शेतकºयाच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी तीन तासांच्या थरारानंतर या चारही सापांना पकडून सुखरूप जंगलात सोडले. हा थरार असंख्य ग्रामस्थांनी अनुभवला.
-------------
समागम काळामुळे घोणस सापांचा वावर
हिवाळा हा घोणस जातीच्या सापांचा समागमाचा किंवा मिलनाचा काळ आहे. या दिवसांत या सापांच्या जोड्या विशेष ठिकाणी काही दिवस दडून बसतात आणि समागम झाल्यानंतर ही जोडी विभक्त होते. याच कारणामुळे लाठी येथे एकाच वेळी घोणस जातीचे चार साप आढळून आले. लाठी येथील शिवारात आढळलेल्या चार सापांपैकी एक मादी जातीचा, तर तीन नर असल्याचे गौरव कुमार इंगळे यांठनी सांगितले.