वाशिम जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांना जबर फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 09:54 AM2018-02-11T09:54:52+5:302018-02-11T09:55:00+5:30
रविवारी सकाळी ६ वाजेपासूनच वाशिम जिल्हयात ढगाळ वातावरण होते. ८ वाजताच्या सुमारास रिसोड तालुक्यातील वाकद परिसरात गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.
वाशिम - रविवारी सकाळी ६ वाजेपासूनच वाशिम जिल्हयात ढगाळ वातावरण होते. ८ वाजताच्या सुमारास रिसोड तालुक्यातील वाकद परिसरात गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान वाशिम शहरातही सकाळी ९.१५ वाजता दरम्यान विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस सुरु झाला.
गत दोन- चार दिवसांपासून जिल्हयात ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले.
वाकद परिसरात वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मालेगाव व वाशिम तालुक्यात वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे