आरोग्य विभागाच्या 'कायाकल्प' पुरस्कारात जिल्ह्याची छाप, उपजिल्हा रुग्णालयासह १२ शासकीय आरोग्य संस्थांना पुरस्कार
By नंदकिशोर नारे | Published: May 9, 2024 04:57 PM2024-05-09T16:57:14+5:302024-05-09T16:57:44+5:30
केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०२२-२३ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.
नंदकिशाेर नारे, वाशिम: केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०२२-२३ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्या मार्गदर्शनात उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्यातील कारंजा, उपजिल्हा रुग्णालय, मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयासह दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांनी हा पुरस्कार पटकावला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने १५ मे २०१५5 रोजी 'स्वच्छ भारत मिशन'चा विस्तार म्हणून 'कायाकल्प पुरस्कार योजना' सुरू केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांमध्ये स्वच्छता, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण पद्धती सुधारणे आणि प्रोत्साहन देणे आणि अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या सुविधांना प्रोत्साहन देणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.