संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त चिखली येथे खंजेरी भजन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:22 PM2017-12-28T13:22:24+5:302017-12-28T13:24:46+5:30

मंगरुळपीर: परंमहंस श्री संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन ३ जानेवारी ते ५जानेवारी, २०१७पर्यंत करण्यात आले आहे.

Khanjeri Bhajan Competition at Chikhli, Sant Zolebaba Yatrotsav | संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त चिखली येथे खंजेरी भजन स्पर्धा

संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त चिखली येथे खंजेरी भजन स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्दे विजेत्या भजनी मंडळांना श्री  झोलेबाबा संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्थ मंडळींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. कार्यक्रमाला गजानन बाबा भजन मंडळ  लाठी व सती आई भजन मंडळ लाठीसह गावकरी मंडळी सहकार्य  करणार आहेत.

मंगरुळपीर: परंमहंस श्री संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन ३ जानेवारी ते ५जानेवारी, २०१७पर्यंत करण्यात आले आहे. प्रौढ विभागाच्या भजन स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी  राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांची तर उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे व रिसोडचे आमदार अमित झनक यांची उपस्थिती राहणार आहे.

या  कार्यक्रमाला अ भा गुरुकुंज आश्रमचे सचीव जनार्धन बोथे,सर्वाधिकारी प्रकाश महाराज  वाघ, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, लॉ.वसंत धाडवे, अभियंता-नारायण बारड, दत्तात्रय भेराणे शेलुबाजार, जिल्हासेवाधिकारी सुनिल सपकाळ, जिल्हाप्रचारक साहेबराव पाटील, जिल्हाभजन प्रमुख संजय क्षीरसागर जिल्हासचिव डॉ.सुधाकर क्षीरसागर, नामदेवराव बोथे अकोला,अरुण वाघ, नागपुर,अनिल पाटील राऊत, शिवदास राऊत, सुभाष शिंदे गोग्री, गंगाधर पाटील, प्रकाश फाटे अकोला,जनसेवक जयस्वाल, महादेव सुर्वे लाठी,शालीकराम पाटील, देवीदास राऊत, अनिल गोठी शेलुबाजार, मोहन राऊत, साहेबराव राठोड, बाबाराव चव्हाण शिवणी,हभप वाघ चिखली, राम राऊत सोमठाणा, विलास लांभाडे, विजय मनवर,रमेश पाटील शेगीकर यांची उपस्थिती राहणार आहे. महिला विभाग भजन स्पर्धेला उदघाटक म्हणून पं.स.च्या सभापती निलिमा देशमुख, तर अध्यक्षस्थानी माजी महीला  व बाल कल्याण सभापती ज्योती गणेशपुरे, अ‍ड.कोमल हरणे, मेघा वाघमारे, प्रतिभा महल्ले, साक्षी पवार कानशिवणी, आशा ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे. भजन स्पध्येमध्ये विजेत्या भजनी मंडळासाठी प्रौढ  विभागाकरिता अनुक्रमे १११११, ९१११, ७१११, ५१११, ४१११, ३१११, २१११, ११११, ९११, ८११, ७११, ६११, ५११, तसेच ३११ रू पये व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे. बाल विभागा करिता अनुक्रमे ७००१,५००१,४००१,२५०१,११११,८११,५११,३०१अशी तर महिला विभागासाठी अनुक्रमे ७००१,५००१,४००१,३००१,२१०१,१५०१, १००१,८०१,५०१ अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या प्रसंगी अ.भा.श्री गुरुदेव सेवामंडळाचे कार्यकर्ते नामदेव धानोरकर धानोरा,
गजानन खुळे बांबर्डा,तुकाराम राऊत अमरावती,महादेव वानखडे ईचा,अशोक पळसकार बार्शीटाकळी,बाळकृष्ण रोकडे, वसंत गावंडे यांच्यासह डॉ.जनसेवक जयस्वाल यांचा माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांचे  हस्ते सत्कार करण्यात येणार आहे सर्व भजनी विजेत्या भजनी मंडळांना श्री  झोलेबाबा संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्थ मंडळींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला गजानन बाबा भजन मंडळ  लाठी व सती आई भजन मंडळ लाठीसह गावकरी मंडळी सहकार्य  करणार आहेत. या भजन स्पर्धेत भजनी मंडळांनी सहभाग घ्यावा  असे आवाहन स्पर्धेचे  व्यवस्थापक सुधाकर भांडेकर यांनी केले आहे.

Web Title: Khanjeri Bhajan Competition at Chikhli, Sant Zolebaba Yatrotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.