वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:09 PM2018-01-06T15:09:34+5:302018-01-06T15:36:32+5:30

वाशिम : आदिवासी जमीन, भूदान जमिनीसह इतर कारणांसाठी आरक्षित आणि खुल्या जमिनींचे गणित जुुळविण्यात लाभदायी ठरणारी वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शनिवारी ही माहिती दिली.

Landbank system of Washim District Administration will soon be implemented in the entire state | वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार

वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय जमिनी, भोगवटदार वर्ग-२ जमिनी, आदिवासी, भूदान, नझुल जमिनी व सिटी सर्व्हे याविषयी सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रत्येक घटकातील जमिनीच्या माहितीची सांगड ‘गुगल मॅप’शी घालण्यात आली असून त्या जमिनीचा नकाशा पाहण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. जमिन कुणाला देण्यात आली, उर्वरीत किती जमिन शिल्लक आहे, याचा सविस्तर तपशील केवळ एका ‘क्लिक’वर पाहता येणे यामुळे शक्य झाले आहे.

- सुनील काकडे
वाशिम : आदिवासी जमीन, भूदान जमिनीसह इतर कारणांसाठी आरक्षित आणि खुल्या जमिनींचे गणित जुुळविण्यात लाभदायी ठरणारी वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शनिवारी ही माहिती दिली.
‘लॅण्ड बँक सिस्टीम’मध्ये शासकीय जमिनी, भोगवटदार वर्ग-२ जमिनी, आदिवासी, भूदान, नझुल जमिनी व सिटी सर्व्हे याविषयी सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक घटकातील जमिनीच्या माहितीची सांगड ‘गुगल मॅप’शी घालण्यात आली असून त्या जमिनीचा नकाशा पाहण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जमिनीवर असलेली प्रादेशिक योजना, विकास योजना आदी माहितीही याद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित जमिन कोणत्या कारणांसाठी आरक्षित आहे, ती जमिन कुणाला देण्यात आली, उर्वरीत किती जमिन शिल्लक आहे, याचा सविस्तर तपशील केवळ एका ‘क्लिक’वर पाहता येणे यामुळे शक्य झाले आहे. या प्रणालीमुळे महसूल विभागात पारदर्शकता निर्माण झाली असून विविध शासकीय कामांना गती मिळाली आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा प्रशासनाने तयार केलेली ही अद्ययावत प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असून वाशिम जिल्ह्याकरिता ही गौरवास्पद बाब असल्याचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगितले.

Web Title: Landbank system of Washim District Administration will soon be implemented in the entire state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.