मानोरा: गरीबांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 13:40 IST2018-02-01T13:29:07+5:302018-02-01T13:40:31+5:30

मानोरा: गरीबांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार
मानोरा: गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर राहत असलेल्या गरीब कुटूंबांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी मानोरा नगर पंचायतच्या सहा नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी मानोराच्या तहसीलदारांकडे ३१ जानेवारीला निवेदन सादर करून या गरीबांच्या नावे घरांचे पट्टे करण्याची मागणी केली आहे.
मानोरा येथे विविध शासकीय जागेवर अनेक लोक घर बांधून आपल्या कुटुंबासह राहत आहेत. हे लोक नियमितपणे नगर पंचायतकडे वार्षिक कराचा भरणाही करतात. शासन निर्णयानुसार या लोकांच्या नावे त्यांच्या घराचे पट्टे होणे आवश्यक आहे; परंतु अद्यापही त्यांना घराचे कायमस्वरूपी पट्टे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना घराच्या बांधकामासाठी क र्ज मिळत नाही, तसेच शासनाच्या घरकूल योजनेचाही लाभ मिळू शकत नाही. ही बाब लक्षात घेत मानोरा नगरपंचायतमधील बांधकाम समिती सभापती ऐफाजशहा मेहमूदशहा, यांच्यासह अहेमदबेग चाँदबेग, शेख वहिद शेख अय्युब, मंजुषा महेश निशाणे , ज्ञानेश्वर गोतकर, सुनिता संतोष भगत या नगरसेवकांनी मानोराचे तहसलीदार डॉ. सुनील राठोड यांच्याकडे ३१ जानेवारीला निवेदन सादर करून शहरातील अतिक्रमणधारक कुटूंबांच्या नावे घराचे पट्ट करावे, अशी मागणी केली आहे.