शिवजयंती महोत्सवानिमित्त वाशिममध्ये १९ फेब्रुवारीला मोटारसायकल रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 04:14 PM2018-02-12T16:14:54+5:302018-02-12T16:20:42+5:30
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या शिवजयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला वाशिममध्ये भव्य स्वरूपात सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला वाशिममध्ये भव्य स्वरूपात सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय १२ ते १९ फेब्रुवारीदरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन असून त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
स्थानिक वाटाणे लॉन येथे १५ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा, स्वच्छ वाशिम, सुंदर वाशिम व पाण्याची बचत काळाची गरज या विषयांवर रांगोळी स्पर्धा होणार आहे. याशिवाय १५, १६ व १७ फेबु्रवारीदरम्यान ‘चालता बोलता’ ही स्पर्धा होणार असून शहरातील शाळा , महाविद्यालये व मुख्य चौकांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात येणार आहे. १९ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ५ वाजता काजळांबा येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व आजचा युवक या विषयावर ही स्पर्धा होईल. तसेच याचदिवशी सकाळी ११ वाजता वाशिम येथील शिवाजी हायस्कुल येथून भव्य सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी हायस्कुलपासून निघणारी ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुसद नाका, महाराणा प्रताप चौक, राजनी चौक मार्गे माहुरवेश, तोंडगाव मस्जिद, गणेश पेठ, टिळक चौक, सुभाष चौक, बालू चौक, शनि मंदीर, गोपाल टॉकीज, पाटणी चौक मार्गे शिवाजी हायस्कुल येथे रॅलीचा समारोप होईल, असे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.