नागपूर-औरंगाबाद मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; दोन सख्या भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 05:11 PM2017-12-22T17:11:44+5:302017-12-22T17:15:27+5:30

शेलूबाजार (वाशिम) : अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवर असलेले दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद मार्गावरील नागी फाट्यानजीक २२ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. शाहबाज खान (५०) व समरोज खान (५५) अशी मृतकांची नावे आहेत.

Nagpur-Aurangabad road; Accident, Death of two brothers | नागपूर-औरंगाबाद मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; दोन सख्या भावांचा मृत्यू

नागपूर-औरंगाबाद मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; दोन सख्या भावांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपूर-औरंगाबाद मार्गावरील नागी फाट्यानजीक २२ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली घटना.तऱ्हाळा  येथील दर्ग्यात सेवा देण्यासाठी आलेले दोघेही भाऊ होते मुळचे काश्मीरचे. घटनेचा पुढील तपास शेलुबाजार चौकीचे पोलीस करीत आहेत.

शेलूबाजार (वाशिम) : अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवर असलेले दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद मार्गावरील नागी फाट्यानजीक २२ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. शाहबाज खान (५०) व समरोज खान (५५) अशी मृतकांची नावे आहेत.

तऱ्हाळा  येथील बाबाजान दर्गाह येथून एम.एच.०४ सी. क्यू. ८३३१ क्रमांकाच्या दुचाकीने शाहबाज खान हे आपला भाऊ समरोज खान याच्यासोबत शेलूबाजारकडे नागपूर-औरंगाबाद मार्गाने जात होते. दरम्यान, नागी फाट्यानजीक अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. शाहबाज खान हे तऱ्हाळा  येथील जगप्रसिद्ध बाबाजान दर्गाह येथे स्वयंपाकी म्हणून सेवा देत होते. ते मूळचे काश्मिरमधील असून, गत काही वर्षांपासून पत्नीसह बाबाजान दर्गाह येथे स्वयंपाकी म्हणून सेवा देण्यासाठी आले होते. त्यांचा काश्मिर येथील भाऊ समरोज खान हा अलिकडेच शेलुबाजार येथे आला होता. तऱ्हाळा येथून शेलूबाजाराकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत या दोघा भावांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेचा पुढील तपास शेलुबाजार चौकीचे पोलीस करीत आहेत.

Web Title: Nagpur-Aurangabad road; Accident, Death of two brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.