रिसोड : युती व आघाडीला झटका; बंडखोर उतरले रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:18 PM2019-10-05T14:18:59+5:302019-10-05T14:19:13+5:30

या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

Risod-ac: The rebels landed in the arena | रिसोड : युती व आघाडीला झटका; बंडखोर उतरले रिंगणात

रिसोड : युती व आघाडीला झटका; बंडखोर उतरले रिंगणात

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख आणि भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव या दोघांनाही रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीमध्ये रंगत आली असून ईतर राजकीय पक्षाच्या उमेदवारांसमोर अडचणी निर्माण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे मातब्बर व जेष्ठ नेते म्हणून अनंतरावांना ओळखल्या जाते. तसेच माजी आमदार विजयराव जाधव यांचेही मतदारसंघामध्ये चांगले वलय आहे. या दोन्ही नेत्यांना प्रमुख पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने दुसऱ्या पक्षाच्या शोधात होते. परंतु त्यातही अपयश आल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही नेत्यांनी अर्ज दाखल केल्याने ईतर उमेदवारांसमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनंतराव देशमुखांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस तर विजयराव जाधव यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवारांना आपले मतदार सांभाळण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यात वंचित आघाडीच्या उमेदवाराने सुध्दा प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. या मतदारसंघामध्ये बहुरंगी अशी लढतीचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांजवळ आपआपले काही गठ्ठा मतदान असल्याची चर्चा असून ईतर काही मतदारांच्या सहाय्याने आपला विजय होवू शकतो त्यामुळे सर्वच जण नशिब आजमावतांना दिसून येत आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीत काही उमेदवार केवळ पाडापाडीचे राजकारण करण्यासाठी उभे राहले असल्याची चर्चा होत आहे. या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
 
मतदारसंघातील प्रमुख उमेदवार
रिसोड विधानसभा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसला तर महायुतीत शिवसेनेसाठी सुटला आहे. काँग्रेसकडून आमदार अमित झनक तर शिवसेनेकडून विश्वनाथ सानप निवडणूक लढवित आहेत. तर वंचित आघाडीकडून दिलीपराव जाधव, मनसेकडून डॉ. विजय उल्लेमाले यांचा समावेश आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने व दुसºया पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करुन अपयश आलेल्या काँंग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव देशमुख व भाजपाचे नेते विजयराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

Web Title: Risod-ac: The rebels landed in the arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.