'शिवाजी महाराज हा नाचण्याचा नव्हे, वाचण्याचा विषय!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:06 PM2018-03-01T14:06:26+5:302018-03-01T20:57:21+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेवुन हिंदवी स्वराज्यांची स्थापना कली, परंतु खोट्या इतिहासामुळे  अद्यापही त्यांचे खरे कार्य समाजासमोर आले नाही. त्यामुळे  शिवाजी महाराज नाचण्याचा नाही तर वाचनाचा विषय असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे  महाराष्ट्राचे प्रवक्ते प्रा.अमोलदादा मिटकरी  यांनी केले.

Shivaji Maharaj is the subject or reading: Amoladada Mitakari | 'शिवाजी महाराज हा नाचण्याचा नव्हे, वाचण्याचा विषय!'

'शिवाजी महाराज हा नाचण्याचा नव्हे, वाचण्याचा विषय!'

Next
ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडच्यावतीने आयोजित केलेल्या जाहीर व्याख्यानात ते छत्रपती शिवराय व धार्मिक समन्वय या विषयावर बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन तहसीलदार वैशाख वाहुरवाघ तर अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे  विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले होते.

 मंगरुळपीर - छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेवुन हिंदवी स्वराज्यांची स्थापना कली, परंतु खोट्या इतिहासामुळे  अद्यापही त्यांचे खरे कार्य समाजासमोर आले नाही. त्यामुळे  शिवाजी महाराज नाचण्याचा नाही तर वाचनाचा विषय असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे  महाराष्ट्राचे प्रवक्ते प्रा.अमोलदादा मिटकरी  यांनी केले.

शिवजयंती निमित्ताने २८ फेब्रुवारी रोजी स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयाच्या मैदानावर संभाजी ब्रिगेडच्यावतीने आयोजित केलेल्या जाहीर व्याख्यानात ते छत्रपती शिवराय व धार्मिक समन्वय या विषयावर बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन तहसीलदार वैशाख वाहुरवाघ तर अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे  विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले होते. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, माजी जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे, नायब तहसीलदार सुभाष जाधव, सागर कुळकर्णी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, माजी पं.स.सभापती भास्कर पाटील, कॉगे्रसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.प्रकाशराव इगोले,  नगरसेवक अनिल गावंडे, युवा नेते सचिन परळीकर, मेघाताई वाघमारे , रमेशराव वानखडे, युनुस खान, सखाराम पाटील, जयश्री बारड यांी याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले तसेच वैमानीक म्हणुन निवड झाल्याबद्दल कुणाल , न्यायाधिशपदी निवड झाल्याबद्दल किरण लुंगे , उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश गावंडे तर क्रिडा स्पर्धामध्ये उल्लेखनीय  कामगीरी केल्याबद्दल सुनिल धोत्र,े नेमाने, लता राठोड या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय तेलंग, निलेश तुळजापुरे, यांनी केले.  प्रास्ताविक  संभाजी बिग्रेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश गावंडे यांनी तर आभार गणेश चिपडे यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोपाल गावंडे, शेखर देशमुख,  प्रविण सावके,  गजानन निचळ, श्रीकृष्ण सावके, प्रकाशराव धोेटे, रुपेश धोटे, विवेक इंगोले, राम परंडे, शरद येवले,  नाना देवळे, राजेश दबडे, निलेश मिसाळ,  गोपाल पत्तटील, गणेश गावंडे, संतोष गांजरे, यशवंत धोटे,  सचिन मांढरे, मनोज काटकर, धिरज महल्ले,  आशिष खेडकर,   अर्जुन सुर्वे, डॉ.बोबडे, सचिन धर्माळे,  अमोल शेंडे, शाम गिरी, रामेश्वर चौधरी,  गणेश लाडके, शाम क्षिरसागर, मनोज भोयर आदिंनी सहकार्य केले.

Web Title: Shivaji Maharaj is the subject or reading: Amoladada Mitakari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.