स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मालेगाव येथे रास्ता रोको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:20 PM2018-05-18T15:20:17+5:302018-05-18T15:20:17+5:30

मालेगाव : नाफेडची तूर खरेदी बंद, पीककर्ज वितरणात व्यत्यय यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ मे रोजी दुपारी १२ वाजता मालेगाव येथील शेलु फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

Stop the way agitation Swabhimani Shetkari Sanghatana at Malegaon! | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मालेगाव येथे रास्ता रोको !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मालेगाव येथे रास्ता रोको !

Next
ठळक मुद्दे मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे औरंगाबाद ते वाशिम या मार्गावरील वाहतूक जाम झाली होती.

मालेगाव : नाफेडची तूर खरेदी बंद, पीककर्ज वितरणात व्यत्यय यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ मे रोजी दुपारी १२ वाजता मालेगाव येथील शेलु फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

शेतकºयांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण राबविणे आवश्यक आहे. मात्र, शेतकरी हितार्थ स्पष्ट व ठोस कार्यवाही नसल्याने शेतकºयांना शासनाकडून दिलासाही मिळत नसल्याची परिस्थिती आहे. नाफेडच्या तूर खरेदीला मुदतवाढ नसल्याने हजारो शेतकºयांचा शेतमाल घरात पडून आहे. हा शेतमाल मातीमोल भावात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. बाजार समितीत किंवा खासगी ठिकाणी तुरीला हमीभावापेक्षा १४०० ते १७०० रुपये कमी दर आहेत. शेतकºयांची लूट थांबविण्यासाठी नाफेडच्या तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, नाफेडचे चुकारे तातडीने देण्यात यावे, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या तसेच इतर सर्व शेतकºयांना तातडीने कर्जवाटप व्हावे, ‘नो ड्यूज’ मागण्यात येऊ नये, यासह अन्य मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे औरंगाबाद ते वाशिम या मार्गावरील वाहतूक जाम झाली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष दामू अण्णा इंगोले, प्रदीप मोरे, बाबा बाई  डॉ प्रकाश  इडोळे, धनंजया लहाने, दीपक विते, विठ्ठल लहाने यांच्यासह कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. 

Web Title: Stop the way agitation Swabhimani Shetkari Sanghatana at Malegaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.