तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:54 AM2017-10-07T01:54:16+5:302017-10-07T01:54:45+5:30
मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत. शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची पाण्याची मोठय़ा प्रमाणात पातळी खालावल्याने यावर्षी शासनाला ऐन हिवाळयातच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे, असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.
नाना देवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६६.७ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील कवठळ, सार्सी, १ सार्सी १, चांधई, दस्तापुर, हिवरा व मोहरी या तलावाची एलएसएल च्या खाली गेली आहे तर मोतसावंगा ७.५२, पिंप्री 0३४, सावरगाव ४ टक्के, कोळंबी ५.८८, सिंगडोह ४.४३, नांदखेडा २४.९५, चोरद ४0 टक्के, झोडगा ३२.५0, उंद्री ३२.७0 , जोगलदरी २७.११, कासोळा ११.४२ या तलावाची पाणी पातळी चिं ताजनक आहे.
त्यामुळे यावर्षी हिवाळ्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहे. यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर रब्बी हंगाम पाण्याअभावी घेणे शक्य नाही यासह गुरांचा, चार्याचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. नदी, नाले, पूर्णत: कोरडे पडल्याने आताच पशुपालकांना उपलब्ध विहिरीतील पाणी काढून आपल्या पशुची तहान भागवावी लागत आहे.
मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणी पुरवठा केला जातो मात्र यावर्षी शहरासह २१ गावांना तीव्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.
अशा विपरीत परिस्थितीतमुळे पाणी टंचाईवर मात करणे अश क्यप्राय असुन यावर लोकप्रतिनिधी व शासनाने उपाय योजना करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे ,मात्र यावर शासन व लोकप्रतिनिधी गांभीर होत नसल्याचे दिसून येते.
उपाययोजना करणे गरजेचे
यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत असल्याने पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना आतापासूनच करणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.