तहसील कार्यालय कारंजा येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन
By admin | Published: April 28, 2017 01:45 AM2017-04-28T01:45:22+5:302017-04-28T01:45:22+5:30
कारंजा लाड : नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागु करण्याबाबत एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
कारंजा लाड : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा कारंजा लाड येथे नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागु करण्याबाबत एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले . सदर आंदोलन वाशिम जि.प.शिक्षक सह.पत.वाशिमच्या करुणा विजय भगत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ दिल्ली यांची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक ३० जानेवारी २०१७ रोजी दिल्ली येथे संपन्न झाली. या सर्वसाधारण बैठकीमध्ये कृती समितीच्यावतीने संपूर्ण भारत देशातील तहसील कार्यालयासमोर शिक्षकांच्या महत्वपूर्ण मागण्या मंजूर करुन घेण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तहसील कार्यालय कारंजा येथे २५ एप्रिल रोजी दुपारी १ ते ४ या वेळात शेकडो शिक्षकांच्या व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ कारंजाच्यावतीने धरणे आंदोलन झाले. सदर धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या नवीन पेन्शन योजना रद्द करुन, जुनी पेन्शन योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनालागु करण्यात यावी, ६ व्या वेतन आयोगाच्या त्रुटी दुरुस्त करणे, ७ व्या वेतन आयोगातील समान काम समान वेतन या तत्वावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश करणे होत. सदर धरणे आंदोलनाचे संचालन विकास सोनटक्के सचिव, विजय भगत कार्याध्यक्ष, सुजाता टकके यांनी पाचरणे नायब तहसीलदार कारंजा यांना शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत निवेदन देवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन सदर प्रश्न शासन दरबारी मांडण्याची विनंती केली .सदर निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी पं.स.कारंजा व गटशिक्षणाधिकारी पं.स.कारंजा यांना देण्यात आल्या .
--