मोबाईल, कॉम्प्युटर दुकानात चोरी
By admin | Published: September 15, 2014 12:37 AM2014-09-15T00:37:03+5:302014-09-15T00:37:03+5:30
मानोरा येथील दुकानातून ४७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
मानोरा: येथील मुख्य बाजार पेठेतील भारत मोबाईल, तसेच कॉम्प्युटर विक्री आणि रिपेरिंग सेंटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १२ सप्टेंबरच्या रात्री घडली.
मानोरा येथील मुख्य बाजार पेठेत भारत मोबाईल आणि कॉम्प्युटर विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहे. दुकानदारांनी १२ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजताच्या सुमारास दुकान बंद क रु न ते तालुक्यातील आपल्या गावी मोहगव्हाण येथे गेले. दुसर्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप तोडल्याचे त्यांना दिसले. दुकानाची पाहणी केली असता मोबाईलचे १८ नग किंमत अंदाजे ३५ हजार, एक लॅपटॉप किमंत अंदाजे १२ हजार, असा एकूण ४७ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी शिवाजी फुलसिंग नोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दुकानाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.