वाशिममध्ये आज समाधान शिबिर
By admin | Published: June 24, 2017 05:29 AM2017-06-24T05:29:41+5:302017-06-24T05:29:41+5:30
महाराजस्व अभियान ; ३६६ तक्रारी निघणार निकाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शनिवार, २४ जून रोजी वाशिम येथील वाटाणे लॉनमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वाशिम उपविभागस्तरीय समाधान शिबिराकरिता वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यातील नागरिकांकडून १७ एप्रिल ते १0 मे २0१७ या कालावधीत तहसीलस्तरावर तक्रारी मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार, वाशिम तालुक्यातून ९0, रिसोड तालुक्यातून २१८ व मालेगाव तालुक्यातून ५८ अशा एकूण ३६६ तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी व संबंधित तालुक्यांचे तालुकास्तरीय अधिकारी यांनी समाधान शिबिरास उपस्थित राहण्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
मंगरूळपीर येथे रविवारी आयोजन
मंगरूळपीर उपविभागातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तेथे रविवार, २५ जून रोजी उपविभागस्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.