वाशिम जिल्ह्यातील ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 04:47 PM2017-12-26T16:47:50+5:302017-12-26T16:50:12+5:30
वाशिम: अत्यंत वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहिम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ९ रस्त्यांच्या मिळून एकूण ९२ किलोमीअर अंतराच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण येत्या १ मेपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्यांनी मंगळवारी दिली.
रस्त्य्यांचे अद्ययावतीकरण करून दळणवळणाच्या समस्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यातच राज्यभरातील हजारो रस्त्यांची गेल्या काही वर्षांत दूरावस्था झालेली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागांकडे शेकडो तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. या पृष्ठभूमीवर राज्यभरातील नादुरुस्त रस्त्यांच्या अद्ययातीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात काही रस्त्यांच्या कामांमा मंजुरी देण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ९ रस्त्यांचा समावेश आहे. प्रत्येकी १० किलोमीटर अंतर मिळून एकूण ९२ किलोमीटर अंतराचे रस्ते या अंतर्गत अद्ययावत करण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या महिनाभरानंतर ही सुरू होणार आहेत. वाशिम जिल्ह्यात मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमध्ये वाशिम मालुक्यातील चिंचखेडा-वारा जहागिर- पार्डी आसरा या रस्त्याचे २८.०० ते ३८.०० हे दहा किलोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून, अमानी-अटकळी-केकतउमरा या रस्त्यावरील २१.०० ते ३१.४०० किमोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून होणार आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यातील जऊळका-पांगराबंदी या रस्त्यावरील ८.०० ते १८.०० किलोमीटर अंतरांचे काम २ कोटी ९९ लाख ९० हजार रुपये खर्चून होणार आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा-तºहाळा या रस्त्याचे १.५०० ते ११.५०० किलोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून, धानोरा=आसेगाव कुंभी या रस्त्याचे ०० ते ११.५०० किलोमीटर अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून होणार आहे. मानोरा तालुक्यातील मानोराज्ञ्-शेंदुरजना-वाईगौळ या रस्त्यावरील २५.०० ते ३५.०० किलोमीटरपर्यंतच्या अंतराचे काम ३ कोटी रुपये खर्चून, तर कारंजा तालुक्यातील कामरगाव-वाडेगाव-भामदेवी-धोत्रा या रस्त्यावरील १०.०० ते २०.०० किलोमीटर अंतरापर्यंतचे काम ३ कोटी रुपये खर्चून, कारंजा-मोखड-कामरगाव या रस्त्यावरील ४.०० ते १४.०० किलोमीटरपर्यंतच्या अंतराचे काम ३ कोटी रूपये खर्चून, तसेच कारंजा ते धनज या रस्त्यावरील १२.५०० ते २२.५०० किलोमीटर अंतरापर्यंतचे काम २ कोटी ९९ लाख रुपये खर्चून केले जाणार आहे. या कामाच्या कार्यारंभ आदेशानंतर संबंधित कंत्राटदाराला निर्धारित मुदतीत ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारावरच त्याच्या वाढलेल्या खर्चाची जबाबदारी राहणार, असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.