मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:16 AM2017-09-29T01:16:05+5:302017-09-29T01:16:15+5:30

वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १  जानेवारी २0१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ ऑक्टोबर २0१७ ते ५  जानेवारी २0१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी  माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे यांनी  गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.

Voter list special revision program! | मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम!

मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम!

Next
ठळक मुद्दे८ व २२ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम दावे, हरकती स्वीकारल्या जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १  जानेवारी २0१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ ऑक्टोबर २0१७ ते ५  जानेवारी २0१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी  माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे यांनी  गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.
या मोहिमेदरम्यान ३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २0१७ या  कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. याच  कालावधीत नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार  असून, वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार  यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज सादर करावे त, असे आवाहन सुनील कोरडे यांनी केले.
मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार  याद्यांची प्रसिद्धी मंगळवार, ३ ऑक्टोबर २0१७ रोजी केली  जाणार आहे. मतदार यादीमधील संबंधित भाग, सेक्शनच्या  ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूएसोबत  बैठक तसेच नावांची खातरजमा करण्याचे काम ७ ऑक्टोबर  आणि १३ ऑक्टोबर २0१७ रोजी केले जाईल. ८ ऑक्टोबर  आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात  येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत ५  डिसेंबर २0१७ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आदी  २0 डिसेंबर २0१७ पर्यंत केले जाईल आणि ५ जानेवारी २0१८  रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ३ ऑक्टोबर ते  ३ नोव्हेंबर २0१७ या कालावधीत सर्व मतदान केंद्रांवर मतदान  केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी,  नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावे,  मयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठी येणारे अर्ज स्वीकार तील. तहसीलदार कार्यालयातसुद्धा हे अर्ज सादर करता येतील.  या अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी,  तहसीलदार कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.

Web Title: Voter list special revision program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.