मतदारयाद्यांच्या विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रमास प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:28 PM2017-10-04T19:28:47+5:302017-10-04T19:34:35+5:30

वाशिम: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ५ जानेवारी २०१८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. 

Voters started specially marked revision program! | मतदारयाद्यांच्या विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रमास प्रारंभ!

मतदारयाद्यांच्या विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रमास प्रारंभ!

Next
ठळक मुद्देविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ ५ जानेवारी २०१८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ५ जानेवारी २०१८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. 
मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार ३ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली. दावे व हरकती ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत स्विकारल्या जाणार आहेत. मतदार यादीमधील संबंधीत भाग, सेक्शनच्या ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूएसोबत बैठक तसेच नावांची खातरजमा करण्याचे काम ७ आॅक्टोबर आणि १३ आॅक्टोबर रोजी केले जाईल. ८ आॅक्टोबर आणि २२ आॅक्टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत ५ डिसेंबरपर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण २० डिसेंबरपर्यंत केले जाईल आणि ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले.

Web Title: Voters started specially marked revision program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.