वाशिम : लाच मागितल्याप्रकरणी गोवर्धन येथील सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:12 AM2018-01-25T01:12:40+5:302018-01-25T01:13:21+5:30
वाशिम : मंजूर असलेल्या घरकुलाचे यादीतील नाव कमी न करण्यासाठी २५00 रुपये लाचेची मागणी करणार्या गोवर्धन (ता. रिसोड जि. वाशिम) ग्राम पंचायतच्या सरपंच नंदाबाई बबन शेळके यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, अशी माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मंजूर असलेल्या घरकुलाचे यादीतील नाव कमी न करण्यासाठी २५00 रुपये लाचेची मागणी करणार्या गोवर्धन (ता. रिसोड जि. वाशिम) ग्राम पंचायतच्या सरपंच नंदाबाई बबन शेळके यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, अशी माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांनी दिली.
गोवर्धन येथील सरपंच नंदाबाई शेळके या आहेत. त्यांचा मुलगा अंबादास हा सरपंच पदाची सर्व कामे पाहतो. सन २0१७ मध्ये गोवर्धन येथे तक्रारदारासह ६६ लोकांना घरकुल मंजूर झाले आहे. ४ जानेवारी २0१८ रोजी तक्रारदार व सरपंच नंदाबाई शेळके व त्यांचा मुलगा अंबादास यांची भेट झाली. तेव्हा अंबादास तक्रारदारास म्हणाला की, घरकुलाचे तुम्हाला ३,५00 रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुमचे नाव घरकुलाचे यादीतून काढून टाकतो. म्हणून तक्रारदाराने सरपंच नंदाबाई व अंबादास यास पैसे देण्याचे कबूल केले. तक्रारदार यांनी पूर्वीच अंबादास यांना १ हजार रुपये दिले. उर्वरित २५00 रुपये सात दिवसांचे आत अंबादासने देण्यास सांगितले.
अशा तक्रारीवरून ६ जानेवारीला पडताळणी केली असता, सरपंच नंदाबाई शेळके यांची लाच निष्पन्न झाली; परंतु लाच रक्कम किती व केव्हा द्यावयाची, हे सरपंच नंदाबाईचा मुलगा अंबादास शेळके हा ठरविणार असल्याने व अंबादास हा गावात हजर नसल्याने त्याची नंतर पडताळणी करण्याचे ठरले. तक्रारदाराने २४ जानेवारी रोजी सांगितले की, सरपंच शेळके व त्यांचा मुलगा अंबादास यांना संशय आल्याने ते पैशाची मागणी करणार नाहीत, तसेच लाचेची रक्कम स्वीकारणार नाहीत, असे जबाबात सांगितल्याने सरपंच नंदाबाई शेळके यांना लाच मागणी प्रकरणात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उप-अधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांनी दिली.
या कार्यवाही पथकामध्ये पोलीस निरीक्षक एन.बी. बोर्हाडे, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील, भगवान गावंडे, नंदकिशोर परळकर, दिलीप बेलोकार, संतोष कंकाळ, निमिन टवलारकर, विनोद सुर्वे, अरविंद राठोड, सुनील मुंदे, विनोद अवगळे, रामकृष्ण इंगळे यांचा समावेश होता.