मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:13 PM2018-01-06T14:13:41+5:302018-01-06T14:14:56+5:30
वाशिम: २५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मतदार दिनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोक शाही मजबूत करावी, या उद्देशाने पुढील आठवड्यापासून जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे.
वाशिम: २५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मतदार दिनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोक शाही मजबूत करावी, या उद्देशाने पुढील आठवड्यापासून जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. या अंतर्गत पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळा, महाविद्यालयात स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रि येला अनन्य साधारण महत्त्व आहे. मतदानाचा टक्का वाढल्यानंतरच जनमत स्पष्ट होते. घटणारे मतदानाचे प्रमाण लोकशाहीसाठी घातकच असते. तथापि, प्रत्यक्ष मतदान प्रक्रि येत सहभागी न होण्यासह अनेक पात्र व्यक्ती अद्यापही मतदानाच्या हक्कापासून वंचित आहेत. अशाच व्यक्ती, युवकांना मतदानाचे महत्त्व कळावे आणि त्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून घेत मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने येत्या २५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मतदान दिनाच्या औचित्यावर जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्यांचा आधार घेण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक तालुका आणि ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून फलकांद्वारे लोकांना मतदानाचे महत्त्व पटविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा निवडणूक अधिकारी आपल्या सहकाºयांसह ही मोहिम राबविणार आहेत. याची जय्यत तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.