वाशिम : शेतक-यांच्या विरोधामुळे पोलीस बंदोबस्तात जलवाहिनीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:26 AM2018-03-10T01:26:10+5:302018-03-10T01:26:10+5:30
वाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतक-यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाइपलाइन टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतक-यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाइपलाइन टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणा-या ग्रामस्थांनी वाघोली फाट्यावर बेमुदत उपोषण केले होते. दरम्यान, २१ फेब्रुवारीला उपोषणकर्त्यांसह इतर हजारो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि शेतक-यांना बारमाही पिके घेता येणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत. असे असताना बॅरेजेस परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता वाशिम शहराला बॅरेजेसमधून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोप कोकलगाव परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केला होता. बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पुरविणे अन्यायकारक असून, वाशिमला न देण्यासाठी तीव्र विरोध वाढला होता.
या विरोधामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांनी वाशिम शहर तातडीची पाणी पुरवठा योजना अंतर्गत पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्याकरिता पोलीस अधीक्षकांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. यासाठी पोलीस अधीक्षकांनी ५ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी, १३ महिला कर्मचारी व एक आरसीपी प्लाटून असा तगडा बंदोबस्त कामाच्या ठिकाणी तैनात केला आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पाइपलाइनच्या कामाला शुक्रवारला प्रारंभ झाला असून, कोणत्याही प्रकारचा त्याठिकाणी अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
शेतक-यांनी केले होते विविध टप्प्यात आंदोलन
पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता सोडू नये, या आग्रही मागणीसाठी यापूर्वी बॅरेज परिसरातील शेतकºयांनी विविध टप्प्यात आंदोलने केली होती. सुरुवातीला जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. त्यानंतर बॅरेज परिसरात पाण्यात जाऊन अनोखे आंदोलन छेडले होते. १५ फेब्रुवारीदरम्यान ५-६ दिवस वाघोली फाट्यावर साखळी उपोषण केले होते. २१ फेब्रुवारी रोजी हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले होते.
बॅरेज परिसरातील शेतक-यांचा प्रचंड विरोध पाहता पोलीस बंदोबस्तात पाइपलाइनच्या कामाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला.