वाशिम : अपघातग्रस्त पुलांचे व अरुंद वळण रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:56 PM2017-12-14T12:56:32+5:302017-12-14T12:57:31+5:30

मानोरा ते तळप -कार्ली मार्गावर अनेक वळणे व पुल असून ते अतिशय अरुंद आहेत. यामुळे येथे नेहमीच अपघात घडत असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे.

Washim: Widening of road accidents involving accidents and cramped road | वाशिम : अपघातग्रस्त पुलांचे व अरुंद वळण रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक

वाशिम : अपघातग्रस्त पुलांचे व अरुंद वळण रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक

Next
ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : अपघातात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
तळप बु. (वाशिम): मानोरा ते तळप -कार्ली मार्गावर अनेक वळणे व पुल असून ते अतिशय अरुंद आहेत. यामुळे येथे नेहमीच अपघात घडत असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देवून या पुलांची रुंदी व वळण रस्ते रुंदीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायतचे उपसरपंच भगवान राठोड यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या रस्त्यावरील अरुंद पूल व अरुंद वळण रस्त्यांमुळे अपघात होवून काहींना प्राण गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले. त्यामुळे या मार्गावरील वळणाचे व पुलाचे रुंदीकरण करणे आवश्यक झाल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे.  मानोरा ते तळप कार्ली हा मार्ग रहदारीचा आहे. परिसरातील तळप, कार्ली, बोरव्हा व यशवंतनगर येथील नागरीक व विद्यार्थी याच मार्गाने तालुक्याच्या ठिकाणी येणे जाणे करतात. तसेच मानोरा ते दारव्हा या बसेस सुध्दा याच मार्गावर धावतात. मानोरा ते दारव्हा या दोन तालुक्यांना व शहरांना जोडणार हा अगदी जवळचा मार्ग आहे.  या मार्गावर असलेले अरुंद वळणे व पुल असल्याचे फलक सुध्दा बºयाच ठिकाणी नसल्याने वाहनाधरकांना याची कल्पना येत नाही.

Web Title: Washim: Widening of road accidents involving accidents and cramped road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम