वॉटर कप स्पर्धा : कारंजा तालुक्यातील आठ गावातील श्रमदान कामाची प्रकल्प संचालकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 05:26 PM2018-01-10T17:26:49+5:302018-01-10T17:30:39+5:30
कारंजा लाड : शेतीच्या विकासासाठी गाव पातळीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरीता कारंजा तालुक्यातील आठ गावाची निवड करण्यात आली. या गावाचा आढावा घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी पाहणी केली.
रस्तोगी कारंजा दौºयावर आले होते. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना भ्रमनध्वनीव्दारे सुचना देण्यात आली की, या प्रकल्पाकरीता प्रेरणा घेता यावी याकरीता पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणाºया सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २ मध्ये कांरजा तालुक्यात प्रथम आलेल्या जयपुर गावाला भेट देउन तेथे केलेल्या कामाची पाहणी करावी. त्यानुसार प्रकल्प संचालक यांनी आपला शासकीय दौरा आटोपुन जयपुर गावाला भेट देउन श्रमदानातून केलेल्या कामाची पाहणी केली. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प करीता कारंजा तालुक्यातील आठ गावाची निवड करण्यात आली. या गावात शेतीच्या विकासाबरोबर गाव विकास व्हावा व लोकांचे मनसंधारण व्हावे त्या दुष्टीने कृषी प्रकल्पातील गावकºयांना प्रेरणादायी, मार्गदर्शन, शिवार फेरी, जलसंधारणाची कामे आदीची माहीती होउन प्रकल्पातील लोकांनी शासनाच्या मदतीने आपल्या गावात लोकसहभाग देउन जयुपर गावासारखी कामे करावी. त्यांनी जयपुर गावाला भेट देउन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेदरम्यान श्रमदानातून सि.सि.टी, गॅबियन, शेततळे, एल.बी.एस, माती नाला बांध, कंपारमेंट बंडींग, कंटुंर बंडीग, वॅट ही कामे तर मशिनव्दारे नाला खोलीकरण व रूंदीकरण, शेततळे आदी कामाची पाहणी केली. स्पर्धेदरम्यान राबविलेल्या विविध उपाय योजना तथा कामाचे नियोजन या बाबीची सखोल माहीती स्पर्धा राबविणारे जयपुर येथील उपसरपंच विजय काळे यांच्या कडून घेतली. व त्यांनी ठेवलेल्या सर्व नोंद पुस्तिकांची पाहणी केली. यावेळी प्रकल्प संचालक यांनी संबधित कृषी विभागाच्या सर्व अधिका-यांना जयपुर येथील कामाच्या नियोजनाचा उपयोग विजय काळे यांच्या सहकायार्ने या योजनेतील गावात करून घेण्याच्या सुचना केल्यात.
यावेळी प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांच्या समवेत कृषीतज्ञ कोळेकर, शुभदा थाळी , जिल्हा अधिक्षक दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी इंगळे, तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे, जयपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी भगत व घुले, ग्रामसेवक नरेश गजभिये, कृषी सहायक सोळंके, गुणवंत ढोकने, फुके याची उपस्थिती होती.