Next

सरकारला जागे करण्यासाठी विनाअनुदानित शिक्षकांची ‘महाआरती’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:55 PM2018-09-05T15:55:21+5:302018-09-05T15:55:55+5:30

कोल्हापूर - अघोषित शाळांना घोषित करून त्वरित अनुदान द्यावे,  दि. १ व २ जुलै रोजीच्या घोषित शाळांना त्वरित अनुदान ...

कोल्हापूर - अघोषित शाळांना घोषित करून त्वरित अनुदान द्यावे,  दि. १ व २ जुलै रोजीच्या घोषित शाळांना त्वरित अनुदान घोषित करावे, २० टक्के अनुदानप्राप्त शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान द्यावे, अशा विविध  मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्य सरकारला जागे करण्यासाठी विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी बुधवारी ‘महाआरती’ केली. शिक्षक दिनी कोल्हापूर विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर आमदार विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांनी या महाआरती आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध केला.