पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण अपघाताचं CCTV फुटेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 10:04 IST2018-10-05T19:59:04+5:302018-10-06T10:04:13+5:30
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळचं लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला, या अपघातात आतापर्यंत चार जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
पुणेः शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळचं लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला, या अपघातात आतापर्यंत चार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर सात ते आठ जण जखमी आहेत. होर्डिंग कटिंगचं काम सुरू असताना तो अख्खा सांगाडा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळला आणि सगळेच हादरले. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पाहताना अंगावर काटा येतो. ४०x२० फुटाचं हे होर्डिंग काढताना त्याच्या मागचा आधारच काढून घेतल्यानं हा धक्कादायक प्रकार घडला.