Next

सिंहगडावर दरड कोसळल्यानं अडकले पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 07:48 PM2017-07-30T19:48:59+5:302017-08-01T12:52:39+5:30

सिंहगड घाट रस्त्यावर 30 जुलै 2017 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने ...

ठळक मुद्देसिंहगड घाट रस्त्यावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.गडावर जाणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला दरड कोसळल्याने गडावर असणारे शेकडो पर्यटक अडकले

सिंहगड घाट रस्त्यावर 30 जुलै 2017 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने गडावर जाणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी जे पर्यटक गडावर गेले आहेत ते दरड कोसळल्यामुळे अडकून पडले आहे. सुट्टीच्या काळात सिंहगडावर वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर असते. दरड कोसळल्याची घटना लक्षात येताच गडावर जाणारी वाहने सुरक्षा रक्षकांनी अडविल्याने दुर्घटना टळली.