यवतमाळ जिल्ह्यात ऑटो व क्रूझरमध्ये अपघात; तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 14:48 IST2019-05-30T14:48:11+5:302019-05-30T14:48:31+5:30
झरी तालुक्यातील मुकूटबन येथे परस्परविरुद्ध दिशेने धावणाऱ्या ऑटो व क्रूझर या दोन वाहनांची गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास टक्कर होऊन तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात ऑटो व क्रूझरमध्ये अपघात; तीन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: झरी तालुक्यातील मुकूटबन येथे परस्परविरुद्ध दिशेने धावणाऱ्या ऑटो व क्रूझर या दोन वाहनांची गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास टक्कर होऊन तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी ऑटोमधून जात होते. मुकुटबनलगतच्या साई जिनिंगसमोर ही घटना घडली. जखमी व मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. जखमींना वणी येथे हलवण्यात येत आहे. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.