रक्तदान करून बाबूजींना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:14 PM2018-07-02T22:14:09+5:302018-07-02T22:14:31+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बाबूजींना आदरांजली अर्पण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बाबूजींना आदरांजली अर्पण केली.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रासेयो पथक, लोकमत परिवार, प्रेरणास्थळ आयोजन समिती, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ पब्लिक स्कूल, हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील बाबूजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, माजी प्राचार्य शंकरराव सांगळे, प्रियदर्शनी सहकारी सूत गिरणीचे संचालक माणिकराव भोयर, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा, वायपीएसचे प्राचार्य डॉ.जेकब दास, प्राचार्य निहारिका प्रभूणे, प्राचार्य डॉ.वीरेंद्र तलरेजा, हिंदी हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक शुक्ला आदी उपस्थित होते. रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.गौरव बोचरे, सामाजिक वैद्यकीय अधिकारी मोबीन डुंगे, तंत्रज्ञ राहुल भोयर, अधिपरिचारक जीवन टापरे, कक्षसेवक रामभाऊ सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.
यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्रमुखांसह प्रगती पवार, डॉ.संजय गुल्हाने, डॉ.गणेश काकड, डॉ.जितेंद्र सत्तुरवार, डॉ.पंकज पंडित, डॉ.राम तत्ववादी, डॉ.अतुल बोराडे, डॉ.दिनेश पुंड, डॉ.अजय पारडे, डॉ.सुहास तायडे, डॉ.अब्दुल अमिन, डॉ.मिलींंद लाभसेटवार, विलास देशपांडे, सुभाष यादव उपस्थित होते. शिबिरात अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी रक्तदान केले. शिबिरासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड, प्रा. आशिष माहुरे यांंनी सहकार्य केले.
महाविद्यालयात वृक्षारोपण
रक्तदान शिबिराच्या उद्घाटनानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसरात अमृत वृक्षांची लागवड करण्यात आली.