नॅचरल शुगरमध्ये बॉयलर प्रज्वलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:54 AM2017-10-11T00:54:37+5:302017-10-11T00:54:52+5:30

महागाव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर अलाईट इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला. संगमेश्वर संस्थानचे महंत ईश्वरभारती धनराजभारती महाराज यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.

Boiler ignition in natural sugar | नॅचरल शुगरमध्ये बॉयलर प्रज्वलन

नॅचरल शुगरमध्ये बॉयलर प्रज्वलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गुंज : महागाव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर अलाईट इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला. संगमेश्वर संस्थानचे महंत ईश्वरभारती धनराजभारती महाराज यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
कारखाना साईडवर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीरत्न बी.बी. ठोंबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती गजानन कांबळे, पंचायत समिती सदस्य शिवाजी देशमुख, रमेश मालपाणी, लक्ष्मणराव जाधव, वेणीचे सरपंच तात्या शिंदे उपस्थित होते.
यावेळी दत्तात्रय कदम व जयश्री कदम यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले. यावेळी बोलताना नॅचरल शुगरचे कार्यकारी संचालक कृषीरत्न बी.बी. ठोंबरे म्हणाले, काळानुरुप शेतीत बदल झाला आहे. शेतकºयांनीही आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. आधुनिक पद्धतीने ऊस लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालन पांडुरंग आव्हाड यांनी तर आभार अनिल ठोंबरे यांनी मानले.

Web Title: Boiler ignition in natural sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.