शिवजयंती महोत्सव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:45 PM2018-02-20T23:45:39+5:302018-02-20T23:46:40+5:30

येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार मडकोनाचे शेतकरी महादेव हारगुडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

Celebration ceremony of Shiv Jayanti Festival Committee | शिवजयंती महोत्सव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा

शिवजयंती महोत्सव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा

Next
ठळक मुद्देछत्रपती महोत्सव : परवेश शाह ‘शिवरत्न संगीत सम्राट’ने गौरवान्वित

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार मडकोनाचे शेतकरी महादेव हारगुडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच छत्रपती महोत्सवातील विविध १७ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस आणि सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
छत्रपती महोत्सवातील पुरस्कार सोहळयाचे आयोजन येथील समता मैदानावर ( पोस्टल ग्राउंड) सोमवारी रात्री करण्यात आले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, बांधकाम विभाग उपअभियंता मनोहर शहारे, मैत्र संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, प्रदीप वादाफळे, समता पर्वचे माजी अध्यक्ष अशोक वानखडे, नरेंद्र गुघाने, सुनील कडू, सुदर्शन बेले, पांडूरंग खांदवे, अरूण गेडाम, प्रवीण मुळे, सुधीर जवादे अविनाश शिर्के, नितीन मिर्झापूरे, सृष्टी दिवटे उपस्थित होते.
यावेळी जगदंबा डेअरीचे संचालक पवन वातिले, रमन बोबडे यांना एटीएम दुध सेंटरच्या प्रयोगा सोबत रोजगार निर्मीतीला चालना दिल्याने गौरविण्यात आले. महोत्सवा दरम्यान पारपडलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात शिवरत्न संगीत सम्राट स्पर्धेत प्रथम क्रमांक परवेश शाह, द्वितीय अमोल काळे, तर तृतीय पुरस्कार शिवरत्न राऊत यांना देण्यात आला.
शिव मॅरेथॉन स्पर्धात रिमा मेश्राम, गुंजन खिची, अवंतीका वासनिक, अजिंक्य गायकवाड, उज्वल कहाते, अभिजीत नाचपेलवार यांनी या स्पर्धेत बाजी मारली. सामान्यज्ञान स्पर्धेत दिव्या देवतळे, नाविण्य गुल्हाणे, दर्शन शेंडे, उर्वशी सवई, अभय कायरकर, मयुर कांबळे, रेणुका निवल, खुषी जाधव यांनी तर शिवकाव्य स्पर्धेत सर्वेश माहुरे, भारत खोब्रागडे, राधा जगताब यांनी वकृत्व स्पर्धेत लखन सोनुले, संतोष तावडे, हर्षल चव्हाण, प्रतीक्षा गुरनुले, पुजा शिंबरे, वृषाली देशमुख, सचिन चंदनखेडे, आशिष कांबळे, सानिका पेटकुले यांनी वेशभुषा स्पर्धेत सई इंगोले, ज्ञानदा देशमुख, यशस्वी घोडे, संकेत तंबाखे, आराध्य वानखडे, शर्वरी ढगे यांनी बाजी मारली. तर मॅरॉथॉन स्पर्धेत अजिंक्य गायकवाड, उज्वल कहाते, अभिजीत नाचपेलवार, रिना मेश्राम, अवंतीका वासनिक, गुंजन खिजी यांनी आणि किल्ले बनवा स्पर्धेत योगेश इंगळे, नितेश इंगळे, तेजस मिरासे, सृती वेळुकर, दामिनी चौधरी, अनिकेत कोतेकर यांनी पुरस्कार पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिव विवाह सोहळा
बक्षीस वितरण समारोहात योगेश धानोरकर आणि शितल तेलंगे यांचा शिव विवाह सोहळा पारपडला. समाजाला नवी दिशा देण्याचे काम या विवाह सोहळ्याने केले.

Web Title: Celebration ceremony of Shiv Jayanti Festival Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.