पाणीटंचाईमुळे नागरिकांनी केली जेसीबीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:04 PM2018-01-29T22:04:56+5:302018-01-29T22:05:28+5:30

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट जीवन प्राधिकरणाच्या जेसीबीची तोडफोड करून संताप व्यक्त केला. विठ्ठलवाडी परिसरात ‘अमृत’ योजनेच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना सोमवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.

Due to the water scarcity, the citizens made the JCB settlement | पाणीटंचाईमुळे नागरिकांनी केली जेसीबीची तोडफोड

पाणीटंचाईमुळे नागरिकांनी केली जेसीबीची तोडफोड

Next
ठळक मुद्देपाईपलाईन फोडली : संदीप टॉकीज परिसर, कंत्राटदारावर रोष

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट जीवन प्राधिकरणाच्या जेसीबीची तोडफोड करून संताप व्यक्त केला. विठ्ठलवाडी परिसरात ‘अमृत’ योजनेच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना सोमवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.
‘अमृत’ योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी शहरात जेसीबीने खोदकाम सुरू आहे. खोदकाम सुरू असताना विठ्ठलवाडीतील जुनी पाईप लाईन फुटली. यामुळे या परिसरातील नागरिकांना महिनाभरापासून पाणी मिळणे बंद झाले. पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी त्यांनी वारंवार प्राधिकरणाला साकडे घातले. मात्र अद्याप ती दुरुस्त करण्यात आली नाही. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी दुपारी जेसीबीची तोडफोड करून रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच प्राधिकरणाच्या अधिकाºयांसह कंत्राटदाराने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी नागरिकांचा रोष शमविण्याचा प्रयत्न केला. महिनाभरापासून विठ्ठलवाडी आणि गाडगेनगरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. नागरिकांनी जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदाराकडे पाईप लाईन दुरूस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे सोमवारी या परिसरात पाईप लाईन खोदण्यासाठी जेसीबी येताच नगरसेवक पिंटू बांगर व नागरिकांनी जेसीबी रोखून धरला. त्यांनी पुन्हा पाईप लाईन दुरूस्तीची मागणी केली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
यामुळे अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी जेसीबीची तोडफोड करून संताप व्यक्त केला. हरगोविंद भुप्ता, रवी सूर्यवंशी, जी. व्ही. मानकर आदींनी कंत्राटदाराच्या कामावर आणि प्राधिकरणाच्या निष्काळजीपणावर तीव्र रोष व्यक्त केला.

प्राधिकरणाला सुनावले, जेलभरोची तयारी
जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार नागरिकांचा विचार करीत नाही. महिनाभरापासून नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहे. मात्र पाईप नाही, बेंड नाही, कामगार नाही, मशीन नाही, अशी विविध कारणे सांगून दुरूस्ती टाळली जात आहे. त्यामुळे पाईपलाईन उखडून फेका, असे नागरिकांनी सुनावले. पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने आम्ही ‘जेलभरो’ आंदोलन करायला तयार असल्याचे सुरेखा दहिकर, विद्या पाटील, शांता वानखडे, स्वाती घुले, वैशाली शेंडे, गीता मडावी आदींनी सांगितले.

सहा महिन्यांपासून प्राधिकरणाचे कवडीचेही लक्ष नाही. शेकडो तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. पाईप नसल्याचे कारण सांगून काम थांबविले. कामाच्या चुकीच्या पद्धतीने पाईप लाईन फुटत आहे. यातून नागरिकांचा संयम ढळला.
- पिंटू बांगर,
नगरसेवक, विठ्ठलवाडी.

मुख्य पाईप लाईन टाकण्यासाठी नाली खोदली जात आहे. त्याच ठिकाणावरून जुनी पाईपलाईन गेली. यात अमृतच्या कंत्राटदाराला काम करण्यास विलंब झाला. त्यांना काळजीपूर्वक तसेच वेगाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहे.
- राजेंद्र अजापुंजे,
अभियंता जीवन प्राधिकरण, यवतमाळ

पाईपचा तुटवडा असल्याने कामास विलंब झाला. कामगारांना क्रमाक्रमाने काम करण्याच्या सूचना आहे. मात्र त्यांनी सर्वच ठिकाणी एकाचवेळी खोदकाम केले. आता लवकरच हे काम पूर्ण होईल.
- स्वप्नील घनकर,
कंत्राटदार, अमृत योजना

Web Title: Due to the water scarcity, the citizens made the JCB settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.